New Goa Airport: दाबोळीनंतर आता मनोहरही सज्ज; इंडिगोची दर आठवड्याला होणार 'एवढी' उड्डाणे

गोव्याच्या मोपा विमानतळावरून राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील आठ शहरांना विमानसेवा मिळणार आहे.
New Goa Airport| Manohar International Airport
New Goa Airport| Manohar International Airport Dainik Gomantak
Published on
Updated on

पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या गोव्यात आजपासून दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली आहेत. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी, इंडिगोने मोपा विमानतळावरून (Manohar International Airport) 168 साप्ताहीक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. सध्या हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, चेन्नई, जयपूर आणि अहमदाबादसाठी उड्डाणे सुरू आहेत.

  • पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले

या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर गोव्यातील (North Goa) मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नाही तर जवळच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने देशातील आठ शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. यामुळे उत्तर गोव्यात पर्यटन व्यवसायाला भरारी येण्याची शक्यता आहे.

New Goa Airport| Manohar International Airport
Manohar International Airport: वेलमक टू गोवा! 'मनोहर' विमानतळावर पहिल्या आगमन आणि उड्डाणचा उत्साह, पाहा खास फोटो

इंडिगोच्या दर आठवड्याला 168 उड्डाणे

इंडिगोने (Indigo) मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. आजपासून ही उड्डाणे सुरू झाली आहे. गोव्याचे पहिले विमानतळ दक्षिण गोव्यातील दाभोळी येथे आहे. चापोरा किल्ला, वागेटर बीच, अंजुना बीच, फोर्ट अगुआडा, बागा बीच, कडोलिम बीच, कलंगुट बीच, सिंक्वेरिम बीच, रेस मॅगोस फोर्ट, बॅसिलिका ऑफ बॉम जीझस, द चर्च ऑफ अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन यासारखी गोव्यातील (Goa) प्रसिद्ध पर्यटन स्थळे फक्त गोव्यात आहे. नवे विमानतळ सुरू झाल्यामुळे पर्यटकांना खूप सोयीसुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

  • नवीन विमानतळाजवळ कलम 144 लागू

दरम्यान, गोव्यात एक नवीन घटना घडली आहे. उत्तर गोव्यातील काही टॅक्सी चालकांनी तालुका, मोपा, वरखंड, नागजर आणि चंदेल टुगेदर फॉर पेडणेकरांच्या बॅनरखाली आंदोलन सुरू केले आहे. सरकारने त्यांच्या टॅक्सींची पिवळ्या-काळ्या टॅक्सी म्हणून नोंदणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच त्यांना विमानतळावर स्वतंत्र काउंटर मिळावे आणि त्यांना ओला आणि उबेर टॅक्सीपेक्षा प्राधान्य मिळावी. हे लक्षात घेऊन उत्तर गोव्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नवीन मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा परिसरात कलम 144 लागू केले आहे. डीएमने गुरुवारपासून पुढील 60 दिवस पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास आणि मिरवणूक काढण्यास मनाई केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com