Goa FDA: दिलेली जबाबदारी अधिक सक्षमपणे निभावणार; संचालक श्‍वेता देसाई

Shweta Desai: अन्नपदार्थांविषयी जी जागृती मोहीम सुरू आहे, त्याला आणखी गती देण्यावर ‘एफडीए’चा भर
Shweta Desai: अन्नपदार्थांविषयी जी जागृती मोहीम सुरू आहे, त्याला आणखी गती देण्यावर ‘एफडीए’चा भर
Goa FDA Shweta DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रत्येकाला सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) जागृती करीत असते. त्याशिवाय दररोज गोव्यात येणाऱ्या दूध, खवा किंवा इतर अन्नपदार्थांची तपासणी करण्याचे काम होत असते. त्यासाठी खात्यातर्फे पथकांची नेमणूक केली आहे. ‘एफडीए’ हे एक महत्त्वाचे खाते असल्याने सरकारने दिलेली जबाबदारी अधिक सक्षमपणे निभावण्यावर आपला कटाक्ष राहणार असल्याचे संचालकपद स्वीकारलेल्या श्‍वेता देसाई यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

गोवा हे पर्यटन राज्य असल्याने राज्यात उपलब्ध असणारे अन्न किती सुरक्षित आहे, याची तपासणी करण्याचे कामही ‘एफडीए’वर आहे. त्यासाठी खरेतर जनतेने अधिक जागृत राहणे आवश्‍यक आहे. जनतेने याबाबत तक्रारी कराव्यात. तक्रार आल्यानंतर आम्ही कारवाई करतोच; परंतु काहीवेळा अनेकजण तक्रारी करण्याकडे दुर्लक्ष करतात, तसे घडू नये. याशिवाय अधिक प्रमाणात ज्या वस्तू गोव्यात दररोज येतात, त्या दूध किंवा इतर पदार्थांची तपासणी केली जाते. त्यासाठी खात्याची प्रयोगशाळा आहे, असे देसाई यांनी सांगितले.

Shweta Desai: अन्नपदार्थांविषयी जी जागृती मोहीम सुरू आहे, त्याला आणखी गती देण्यावर ‘एफडीए’चा भर
FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

श्‍वेता देसाई, संचालक, ‘एफडीए’

गोव्यात स्थानिक काजू म्हणून बाहेरचा काजू मोठ्या प्रमाणात विकला जातो. त्याविषयी काही तक्रारी येतात. त्यामुळे पथकामार्फत वारंवार काजूची तपासणी केली जाते. सरकारने माझ्यावर जो विश्‍वास टाकला आहे, तो सार्थ ठरविण्याचे कामही आपले आहे. अन्नपदार्थांविषयी जी जागृती मोहीम सुरू आहे, त्याला आणखी गती देण्यावर ‘एफडीए’चा भर राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com