Goa School Exam: 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! परिक्षा प्रक्रियेत होणार बदल; वाचा संपूर्ण माहिती

Goa Education: विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या उद्देशाने शाळांच्या विनंतीनुसार नियमांत शिथिलता आणली आहे; परंतु ही सूट केवळ यंदाच असेल.
Goa SSC Exam 2025
Goa SSC Exam 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, स्पर्धात्मकता वाढावी तसेच शिक्षणात एकसूत्रता यावी, या उद्देशाने यंदा प्रथमच राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान एकाचवेळी आयोजित केल्या असून सर्वांना समान प्रश्‍नपत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती ‘जीएससीईआरटी’च्या संचालक मेघना शेटगावकर यांनी दिली.

पर्वरीतील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी करुणा तर अधिकारी उपस्थित होते. शेटगावकर म्हणाल्या, की या परीक्षा वेळेत तसेच ‘जीएससीईआरटी’ने आखून दिलेल्या नियमानुसार पार पडत आहेत का, हे पाहण्यासाठी प्रत्येक राज्यातील बाराही तालुक्यांमध्ये भरारी पथके तैनात करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात किमान दोन पथके कार्यरत असतील, असे त्यांनी सांगितले.

यंदा नियमांत काहीशी शिथिलता

परीक्षा प्रक्रियेत यंदा प्रथमच अशा प्रकारचे बदल केल्याने काही प्रमाणात शाळांना समस्या येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या उद्देशाने शाळांच्या विनंतीनुसार नियमांत शिथिलता आणली आहे; परंतु ही सूट केवळ यंदाच असेल. पुढील वर्षापासून नियमांत कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात येणार नाही, असे शेटगावकर यांनी सांगितले.

Goa SSC Exam 2025
Goa Education Recruitment: शिक्षण क्षेत्रात नोकर भरतीत घोटाळा! गोवा फॉरवर्डचे आरोप; न्यायालयात जाण्याचा इशारा

...अशी असेल नवी परीक्षा प्रक्रिया

१ तिसरी व चौथीची परीक्षा ९ ते १५ ऑक्टोबर, तर सहावी ते आठवीची परीक्षा ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होईल.

२ कोकणी माध्यमाच्या काही शाळांनी इंग्रजीतून प्रश्‍नपत्रिका देण्याची विनंती केली असून केवळ यंदाच ही मागणी पूर्ण करण्यात येत आहे.

Goa SSC Exam 2025
Education Recruitment Scam: शिक्षण खात्यांत नोकर भरती प्रक्रियेंत घोटाळो, गोवा फॉरवर्डचो आरोप; Watch Video

३ उर्दु माध्यमाच्या शाळांनी तृतीय भाषेचा पेपर इंग्रजी भाषेत असावा, अशी विनंती केली होती. तीही मान्य केली आहे.

४ ज्या शाळांना काही समस्या जाणवल्यास किंवा सूचना करायची असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी ‘जीएससीईआरटी’ला कळवावे.

५ काही शाळांना या कालावधीत परीक्षा घेणे शक्य होणार नाही, त्यांना वेगळ्या प्रश्‍नपत्रिका पुरविण्यात येतील; परंतु ही शिथिलता केवळ याचवर्षी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com