Mapusa Garbage Issue: म्हापसा पालिकेच्या ताफ्यात 'कॉम्पेक्टर'; कचऱ्याचे ढीग होणार कमी

Mapusa Waste Problem: नगरविकास खात्यामार्फत पालिकेला ४० लाख रुपये किमतीचे कॉम्पेक्टर हे कचरावाहू वाहन उपलब्ध करण्यात आले आहे
Mapusa Waste Problem: नगरविकास खात्यामार्फत पालिकेला ४० लाख रुपये किमतीचे कॉम्पेक्टर हे कचरावाहू वाहन उपलब्ध करण्यात आले आहे
Compactor | MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: म्हापसा पालिका क्षेत्रात जागोजागी कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून पालिका हा कचरा उचलण्यास अपयशी ठरल्यासंदर्भात दै. गोमन्तकमधून आवाज उठवल्यानंतर लोकप्रतिनिधींना जाग आली असून नगरविकास खात्यामार्फत पालिकेला ४० लाख रुपये किमतीचे कॉम्पेक्टर हे कचरावाहू वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. निदान आता तरी पालिका क्षेत्रात तुंबलेला कचरा कमी होईल, अशी अपेक्षा लोक बाळगून आहेत.

आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्या हस्ते नारळ वाढवून या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर, अभियंता प्रशांत नार्वेकर तसेच नगरसेवक सुधीर कांदोळकर, तारक आरोलकर, आशीर्वाद ऊर्फ परेश खोर्जुवेकर, आनंद भाईडकर, शुभांगी वायंगणकर, प्रिया मिशाळ आदी उपस्थित होते.

Mapusa Waste Problem: नगरविकास खात्यामार्फत पालिकेला ४० लाख रुपये किमतीचे कॉम्पेक्टर हे कचरावाहू वाहन उपलब्ध करण्यात आले आहे
Mapusa Garbage Issue: कामगार इतके मग कचरा उचल का होत नाही? म्हापसा पालिका अधिकारी करतात काय?

पथदीप, खड्डे दुरुस्तीस सुरवात

म्हापसा शहर व पालिका क्षेत्रातील अन्य पथदीप दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही सुरू झाले आहे, असे आमदार डिसोझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com