Investigation Team For Investigate Banastarim Bridge Accident: बाणस्तरी अपघाताच्या चौकशीसाठी क्राईम ब्रांचने पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची स्थापना केली आहे. आज या पथकाने पार्टीचे ठिकाण आणि बाणस्तरी पूलावरील अपघात स्थळाची पाहणी केली.
राज्य सरकारने बाणस्तारी अपघात प्रकरणाचा तपास म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे दिला आहे.
मर्सिडीझ कारने श्रीपाद ऊर्फ परेश सिनॉय सावर्डेकर फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होता. यावेळी तो जोडरस्त्यावरून बाणस्तारी पुलाजवळ मुख्य रस्त्यावर येताना या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण गेल्याने ती दुसऱ्या बाजूला गेली.
त्यामुळे फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींसह तीन कारना धडक देऊन कार खांबाला आदळली व पुलाच्या पदपथावर अडकली असे प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी सांगितले. हा अपघात रात्री रात्री आठच्या सुमारास झाला.
या अपघातात तिघांचा बळी गेला होता. अन्य तिघे गंभीर अवस्थेत गोमेकॉत उपचार घेत आहेत. उपचार घेणाऱ्यांमध्ये जेष्ठ नागरिक, महिला आणि एका युवकाचा समावेश आहे.
बाणस्तारी अपघातप्रकरणी दिवाडीच्या नागरिकांसह आमदार राजेश फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत हा तपास क्राईम ब्रँचकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती.
प्रकरणाचा तपास म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे देण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीवेळी दिली होती.
आज पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने अपघात स्थळाची पाहणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.