Goa Assembly Session: एकही घर न पाडता बोरी पूल बांधणार; मुख्यमंत्री सावंत

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: सध्याच्या बोरी पुलाच्या दुरुस्तीवर २० कोटी खर्च केले जाणार आणि त्‍याचे आयुष्यमान २० वर्षे असताना नवा पूल का हवा? विजय सरदेसाई यांचा सवाल
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: सध्याच्या बोरी पुलाच्या दुरुस्तीवर २० कोटी खर्च केले जाणार आणि त्‍याचे आयुष्यमान २० वर्षे असताना नवा पूल का हवा? विजय सरदेसाई यांचा सवाल
CM Pramod SawantCanva
Published on: 
Updated on: 

एकही घर न पाडता नवा बोरी पूल बांधला जाणार आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले.

यावेळी आमदार विजय सरदेसाई यांनी, कोळसा वाहतुकीसाठी हा पूल बांधला जात असल्याचा आरोप केल्यावर मुख्यमंत्र्यांनी केवळ कोळशाचीच वाहतूक पुलावरून केली जाणार नाही, असे सांगितले. ‘कोळसा वाहतुकीसाठी पूल नाही’, असे थेट न सांगितल्याने विरोधकांनी सरकारवर यानिमित्ताने हल्लाबोल केला.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: सध्याच्या बोरी पुलाच्या दुरुस्तीवर २० कोटी खर्च केले जाणार आणि त्‍याचे आयुष्यमान २० वर्षे असताना नवा पूल का हवा? विजय सरदेसाई यांचा सवाल
New Borim Bridge: शेतकऱ्यांनाही नव्या पुलाची आवश्यकता!

‘बोरीत नवा पूल हवाच कशाला?’

राज्यातील १८ हजार हेक्टरपैकी ४ हजार हेक्टरमधील खाजन शेती हातातून गेली आहे. त्यातच नवा बोरी पूल खाजन जमिनीतून नेला जाणार आहे. तेथे भाजीपाला पिकवला जातो तसेच शेती केली जाते. त्यांना द्यावयाची भरपाई कशी ठरवणार? असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्‍थित केला. सध्याच्या बोरी पुलाच्या दुरुस्तीवर २० कोटी खर्च केले जाणार आणि त्‍याचे आयुष्यमान २० वर्षे असताना नवा पूल का हवा? कोळसा कर्नाटकात नेण्यासाठी हा पूल हवा आहे का? असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com