Sanauelim School : नवी शाळा, नवा वर्ग, नवे मित्र..सारे भारावले; साखळीतील शाळांत नवा उत्साह

Sanauelim School : शिक्षकांकडून मुलांची उजळणी; नवीन मुलांचे पहिल्या दिवशी औक्षण करून स्वागत करण्यात आले. सर्व विद्यालयांत सध्या मुलांचा उत्साह दिसून येत आहे.
Sanauelim School
Sanauelim School Dainik Gomantak

Sanauelim School :

साखळी, नव्या शैक्षणिक वर्षाला ४ जूनपासून सुरूवात झाली. दीड महिन्याच्या सुटीनंतर मुले शाळेत परतली आहेत.

नवीन मुलांचे पहिल्या दिवशी औक्षण करून स्वागत करण्यात आले. सर्व विद्यालयांत सध्या मुलांचा उत्साह दिसून येत आहे.

पहिल्या दिवशी सर्व शाळा, हायस्कूलमध्ये पालक आपल्या पाल्यांना घेऊन दाखल झाले. पहिला दिवस असल्याने सर्व विद्यार्थ्यांत नवा उत्साह होता. नवा वर्ग, नवी जागा, नवे मित्र यामुळे विद्यार्थी सुखावले आहेत. शिक्षकही मुलांची मानसिक उजळणी करू लागले आहेत.

Sanauelim School
Goa Traffic Police: गोवा पोलिसांनी मद्यपी चालकांना दाखवला 'पोलिसी खाक्या'; 249 गुन्हे दाखल; 2124 प्रकरणे उघडकीस

आमची ड्यूटी सुरू

दीड महिना सुटी असल्याने आम्हीही बिनधास्त होतो, परंतु आता शाळा सुरू झाल्याने मुलांबरोबर आमचीही ड्यूटी सुरू झाली आहे. त्यांना सकाळी लवकर उठवून शाळेसाठी तयार करावे व नंतर शाळा सुटण्याच्या वेळी न्यायला यावे, हा क्रम सुरू झाला आहे, असे एक पालक संगेश कुंडईकर यांनी सांगितले.

एनईपीनुसार शिक्षण सुरू

यंदा नव्या शैक्षणिक धोरणाचा अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. शालेय वर्षाच्या प्रारंभीचा उत्साह विद्यार्थी व पालकांमध्येही आहे. पहिल्याच दिवसापासून अभ्यासाबरोबरच मुलांना विविध उपक्रमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून पालकांकडूनही सहकार्य अपेक्षित आहे, असे विठ्ठलापूर, कारापूर येथील विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया बोकाडे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com