Goa: पावसाचा ८३२ हेक्टर शेतजमिनीला फटका

भातपीक, भाजीपाला गेला वाहून : बागायतींचेही प्रचंड नुकसान
Mejor Agriculture loss in Goa
Mejor Agriculture loss in GoaDainik Gomantak

सासष्टी : राज्यात (Goa State) गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेती-बागायतींमध्ये (Agricultere) पाणीच पाणी झाल्याने भातशेती, फळभाज्यांना जोरदार फटका बसला आहे. (Flood) राज्यातील विविध भागांत लागवड केलेली भातशेती, फळभाज्यांचे पीक भुईसपाट झाले. सध्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याने कृषी विभागाला पाहणी करून पंचनामे करणे शक्य झालेले नाही. राज्यात ८३२ हेक्टर (832 Hector) शेतजमिनी तसेच बागायतींना पावसाचा फटका बसला असून पिकांचे दोन कोटी ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसामुळे पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्यातील विविध भागांत कृषी अधिकारी (agricultere Officers) पाहणी करीत आहेत. सध्या कृषी विभागाने केलेल्या पाहणीतून ८३२ हेक्टर शेतजमिनी तसेच बागायतींना पावसाचा फटका बसल्याचे समोर आले आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक असून अर्ज केल्यावर शेतकरी आधार निधीअंतर्गत एका महिन्याच्या आत आर्थिक मदत पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफांसो यांनी दिली. (Nevil Afonso)

Mejor Agriculture loss in Goa
Goa: केरीतून होणारी अवजड वाहतूक स्थानिकांना ठरते धोकादायक

यंदा लावणीच्या हंगामात भरपूर पाऊस पडल्याने भातशेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नुकतीच लागवड केल्यामुळे रोपे लहान असून ती कुजण्याची शक्यता कमी आहे. पण, १५ दिवसांच्या वर भातशेतीत पाणी साचून राहिल्यास रोपे खराब होण्याची शक्यता आहे. नुकसान भरपाईसंबंधी भातशेतीचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व कृषी उपविभागीय अधिकारी (agricultere Officers) पाहणी करीत आहेत. पण जोपर्यंत शेतातील पाणी उतरत नाही, तोपर्यंत मूल्यांकन करणे अशक्य आहे. सध्या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असून आता त्वरित पाहणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, असे नेव्हील आफांसो (Nevil Afonso) यांनी सांगितले.

Mejor Agriculture loss in Goa
Goa: वेळगे पंचायतीच्या सरपंचपदी मुकेश घाटवळ यांची वर्णी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com