Goa: केरीतून होणारी अवजड वाहतूक स्थानिकांना ठरते धोकादायक

नागरिकांत वाढता रोष (Anger among citizens) (Goa)
Heavy transport truck on Kerim  - Sattari road, Goa. on27 July, 2021.
Heavy transport truck on Kerim - Sattari road, Goa. on27 July, 2021.Dasharath Morajkar / Dainik Gomantak
Published on
Updated on

चोर्ला घाट ( Chorla ghat road joining Sankhali Goa to belguam) हा अवजड व अति अवजड वाहनांसाठी बंदीचा आदेश असतानाही या मार्गावरून राजरोसपणे वाहतूक होत असून त्याचा धोका केरी सत्तरीतील( Kerim sattari) सर्वसामान्यांना होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चोर्ला घाटाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी (North Goa Collector) दिला होता, पण या आदेशाची दररोज पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी यंत्रणेच्या या दुर्लक्षामुळे येथून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतूकीचा धोका आता केरी- मोर्ले (Kerim - Morlem) भागातील नागरिकांना होत आहे.

Heavy transport truck on Kerim  - Sattari road, Goa. on27 July, 2021.
"गोव्यातील राजकारण थर्ड क्लास"

अवजड वाहनाने तोडली वीज वाहिनी

दरम्यान काल रात्री या मार्गावरून येणाऱ्या एका अति अवजड वाहनाने केरी (दोन माड) येथील एका आस्थापनाला वीज पुरवठा करणारी वीज वाहिनी तोडली. तुटलेली जिवंत वाहिनी जमिनीवर पडून त्याचा धोका निर्माण झाला. त्यानंतर लगेचच स्थानिकांनी वीज बंद करून ती वाहिनी हटवली त्यामुळे होणार मोठा धोका टळला. त्यानंतर इथले काही लोक केरीतील रस्ता वाहतूक अधिकारी कार्यालय व ट्राफिक पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी याविषयी कानावर हात ठेवले.

Heavy transport truck on Kerim  - Sattari road, Goa. on27 July, 2021.
Goa: खाण कामगारांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

अवजड वाहतुकीबद्दल रोष

दरम्यान या वाहतुकीबद्दल केरी परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे, या संबंधी केरी ग्रामपंचायत सरपंच दाऊद सय्यद (Daud sayyad, Sarpanch) यांनी सांगितले की सरकारी आदेश मोडून वाहतूक चालू असणे, म्हणजे पोलिसांकडून मुद्दामहून या विषयी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. अवजड वाहतूक बंद असताना तीच तीच वाहने या मार्गावरून येताना दिसतात. तेव्हा हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मार्गावरून अवजड वाहने आल्यामुळे रस्त्याकडेला विजेच्या वाहिन्या तुटतात. रस्ता अरुंद असल्यामुळे त्याचा धोका स्थानिक प्रवाशांना होतो तसेच रस्ताही खचतो. तेव्हा अशा धोकादायक ठरणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणावे अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com