वाटलं नव्हतं जीवंत घरी पोहोचेन, बाणावलीच्या जेडनने सांगितला थरारक किस्सा

जेडन शनिवारी दुपारी गोव्यात दाखल झाला.
Jaden
Jaden Dainik Gomantak
Published on
Updated on

रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटले आहेत. युक्रेनमध्ये स्थित भारतीयांना देखील या युद्धाची झळ बसली. यात अनेक गोवेकरांचा समावेश होता. युद्धादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेला गोव्याचा जेडन सुखरूप मायदेशी परतला आहे. त्याने युद्धात घडलेला थरारक प्रसंग गोव्यात परत आल्यानंतर माध्यमांना सांगितला.ही युद्धपरिस्थिती सांगत असताना त्याने आपली व्यथाही व्यक्त केली. जेडन दक्षिण गोव्यातील (South Goa) बाणावलीचा रहिवाशी आहे.

Jaden
मयेतील माया केळबाय देवस्थानची निवडणूक घेण्यास विरोधकांची हरकत

"रशिया-युक्रेन युद्ध फार भयावह आहे. अनेकदा आम्हाला पुढचा दिवस बघण्याची शाश्वती नसायची. सायरन वाजताच आम्हाला विद्यालयाच्या खाली स्थित बंकरमध्ये पळावे लागायचे. दोन आठवडे आम्ही ब्रेड, नूडल्स आणि फळे खाऊन दिवस काढले. बंकरमधील तापमान 5 अंश सेल्सिअस होते. आमि ही परिस्थिती फार बिकट होती, मात्र आम्ही हिम्मत हारली नाही, आम्ही मायदेशी परणार अशी आशा आम्हाला होती," असा अनुभव युक्रेन मधून परतलेल्या जेडनने सांगितला.

जेडन शनिवारी दुपारी गोव्यात दाखल झाला. त्याने युक्रेनमधील (Ukraine) भयावह परिस्थितीचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, "पाणी संपले होते तेव्हा बर्फ वितळवून तयार झालेले पाणी पिऊन आम्ही दिवस काढले. रोज संध्याकाळी 7 वाजता वीज कट केली जायची. पुढे रात्रभर काळा कुट्ट अंधार असायचा. एक छोटीशी खिडीकीच आम्हाला बाहेरच्या जगाशी जोडून ठेवत होती. पडकी घरे , रस्त्यावरून (Road) पळणारी माणसे आम्ही त्या खिडकीतून पाहिली आहेत. विमानांचा आणि गोळीबाराचा आवाज येताच छातीची धड धड वाढायची.जीव मुठीत घेवून आम्ही त्या बंकरमध्ये दिवस काढले."

Jaden
पणजीत नव्या महापौरांच्या नावाची चर्चा

जेडनने भारत सरकारचे मानले आभार

“भारतीय दूतावासाने आम्हाला योग्य वेळी बाहेर काढले नसते तर काय झाले असते याची मी कल्पना देखील करू शकत नाही.आम्ही भारत सरकार (Government) आणि एनआरआय आयोगाचे आभारी आहोत, सीमे पर्यंतचा प्रवास थकवणारा होता. मात्र, आम्ही चालत राहिलो. अखेर आम्ही भारताची सीमा गाठली," असे म्हणत या जिवघेणा प्रवास त्याने माध्यमांसोबत शेअर केला.

यावेळी आपल्या मुलाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मात्र अश्रू अनावर झाले. आईने जेडेनला मिठीत कवटाळले. "आमचा मुलगा सुखरूप परतला याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही भारत सरकारचे आभार मानतो," असे उद्गार यावेळी जेडेनच्या आईच्या तोंडून निघाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com