Neura: अपघाती मृत्यू झालेल्या मजुराच्या कुटुंबाला दिलासा! मोटार लवादाने दिला 39.47 लाख भरपाईचा आदेश

Neura Old Goa Accident Case: नेवरा-जुने गोवे येथील जंक्शनवर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाववेगात असलेल्या रिक्षाने धडक दिल्याने खडक मक्कर बहादूर या गवंडी मजुराचा मृत्यू झाला होता.
Court Order
CourtCanva
Published on
Updated on

पणजी: नेवरा-जुने गोवे येथील जंक्शनवर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाववेगात असलेल्या रिक्षाने धडक दिल्याने खडक मक्कर बहादूर या गवंडी मजुराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्याच्या सासू व मुलांनी केलेल्या भरपाईचा अर्ज ग्राह्य धरून मोटार वाहन दावे लवादाने रिक्षा मालक व चालक तसेच बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीला ३९.४७ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. अर्ज दाखल केल्यापासून ९ टक्के व्याजासह ही रक्कम देण्याचे निवाड्यात नमूद केले आहे.

गवंडी काम करणारा खडक बहादूर हा ३१ जुलै २०२६ रोजी मालवाहू रिक्षात मागे बसून कामाला जात होता. ही रिक्षा मरेशी येथून जुने गोवे दिशेने जात होती. नेवरा येथील मडकईकर रेसिडेन्सी येथे उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात मागे बसलेले बहादूर हा जागीच ठार झाला होत तर रिक्षा चालकाने पलायन केले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून चालकाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

Court Order
Mapusa Crime: म्हापशात भरस्त्यात मद्यधुंद तरुणाचा हैदोस; वाहतूक रोखली, पोलिसांनी घेतलं ताब्यात

बहादूर याची पत्नीचे निधन झाले होते व त्याच्या चार मुलांचा सांभाळ त्याची सासू शांता चौहान (६३ वर्षे) करत होत्या. अपघातातील बहादूरच्या निधनानंतर तिने व चार मुलांनी भरपाईचा अर्ज मोटार वाहन दावे लवादाकडे केला होता.

या अर्जात रिक्षा चालक व मालक तसेच विमा कंपनीला प्रतिवादी केले होते. लवादाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांनी त्याच्या कुटुंबीयांचा विचार करता व त्याचे वय तसेच प्रतिदिन मिळणाऱ्या रोजंदारीचा हिशोब करून ३९ लाख ४७ हजार ४२० रुपये देण्याचा आदेश दिला. रिक्षा चालक व मालकाने या रक्कमेपैकी ५० टक्के तर उर्वरित ५० टक्के रक्कम ही विमा कंपनी व चांदसाब हुंदेकर याच्याकडून वसूल करण्याचे निर्देश दिले.

Court Order
Goa Crime: धक्कादायक! गोव्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नेपाळी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद

सासू करते चार मुलांचा सांभाळ

मयत खडक बहादूर याचा मृत्यू झाला तेव्हा तो ३४ वर्षाचा होता. त्याच्या पत्नीचे त्यापूर्वीच निधन झाले होते. त्याची चार मुले ही १४ ते १७ वयोगटातील असून ती शिकत आहेत. त्यांचा सांभाळ ६३ वर्षे असलेल्या त्याच्या सासू करत आहेत. त्याच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचा आधारच गेला. हा अपघात रिक्षा चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कायद्यानुसार या कुटुंबीयांना भरपाई मिळायलाच हवी, असे निरीक्षण लवादाचे न्यायाधीश आगा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com