
Minor Girl Sexual Assault Goa Nepalese Man Arrested
मडगाव: राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना चिंतेचे कारण ठरत आहेत. पोलिसांचा वचक कमी होत चालला आहे का? असा सवाल गोमंतकीयांकडून उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान, मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.
एका अल्पवयीन मुलीला स्कूटरवरुन नेऊन तिच्यावर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घडली. याप्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) एका नेपाळी तरुणाला अटक केली. शुभम ओली असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हाही दाखल केला. संशयितांवर गोवा बाल कायदा कलम 8 आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याची पोलिसांनी नोंद केली. उपनिरीक्षक सोनल गावकर पुढील तपास करत आहे.
दरम्यान, गोवा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उभा राहतो. यापूर्वीही अशा काही घटना घडल्या असून पोलिसांनी अशा घटनांविरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी गोमंतकीयांकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.