'गोवा बनतेय महिला तस्करीचे केंद्र'

काँग्रेस महिला अध्यक्षा नेट्टा डिसोझा (Neta D'Souza) यांनी सरकारवर केला आरोप आहे.
Neta D'Souza
Neta D'SouzaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भाजप सरकारच्या (BJP Government) काळात राज्यात महिलांविरोधी गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कायदा व सुव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. हे सरकार महिला सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे. गोव्यात (Goa) महिला तस्करीचे प्रमाण देशातील नोंद असलेल्या टक्केवारीपेक्षा अधिक आहे. या सरकारची विचारसरणी महिलाविरोधी आहे. सरकारने गोवा हे महिला तस्करी केंद्र बनविले असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस महिला अध्यक्षा नेट्टा डिसोझा (Neta D'Souza) यांनी केला.

Neta D'Souza
शहरी आणि ग्रामीण भागांतही 'जनमन उत्सवा'चे स्‍वागत

पणजीत (Panaji) आज काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्षा बिना नाईक उपस्थित होत्या. यावेळी डिसोझा म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी, बेकायदेशीर कारवाया, भ्रष्टाचार तसेच इंधन दरवाढीमुळे राज्यातील सामान्य व गरीब जनता मेटाकुटीला आली आहे. गोमंतकियांना उदारनिर्वाह चालविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दर दिवशी राज्यात महिलांविरोधी गुन्हे नोंद होत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात दरवर्षी सरासरी महिलांसंदर्भातच्या 200 प्रकरणे नोंद होत असून हे प्रमाण 24 टक्के आहे. 2017 ते फेब्रुवारी 21 पर्यंत राज्यामध्ये महिलांसंदर्भातील सुमारे एक हजार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात महिला तस्करीचे प्रमाण 1.1 टक्के आहे. हे प्रमाण गोव्यासाठी घातक आहे. हे सरकारला महिलांच्या सुरक्षितेबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत काहीच पडलेले नाही. सिद्धी नाईक या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत सरकार गंभीर नाही अशी टिका त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com