Appreciate to Janman Utsav in both urban and rural areas
Appreciate to Janman Utsav in both urban and rural areas Dainik Gomantak

शहरी आणि ग्रामीण भागांतही 'जनमन उत्सवा'चे स्‍वागत

गोमंतकीय महिलांच्या आशा-आकांक्षाना खतपाणी घालून त्यांच्या मनातील गोव्याचा महान वटवृक्ष तयार करण्याच्या इराद्याने ‘गोमन्‍तक’ने हाती घेतले जनमन उत्सव सर्वेक्षण
Published on

गोमंतकीय महिलांच्या आशा-आकांक्षाना खतपाणी घालून त्यांच्या मनातील गोव्याचा महान वटवृक्ष तयार करण्याच्या इराद्याने ‘गोमन्‍तक’ने हाती घेतलेल्या जनमन उत्सव सर्वेक्षण उपक्रमाला ग्रामीण तसेच शहरी भागांतील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. केपेतील अगदी टोकाचा भाग असलेल्या मोरपिर्ला व पाडी या परिसरांसह कुंकळ्ळी भागातील बाळ्ळी, नावेली मतदारसंघातील नावेली, तळावती तसेच मुरगाव मतदारसंघातील वाडे येथील भागात हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्व भागातील महिलांनी आतापर्यंत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला या उपक्रमात आवर्जून सहभागी होताना दिसतात. या उपक्रमातून ‘गोमन्‍तक’ राज्‍यातील तीन लाख महिलांपर्यंत जाणार असून त्यांच्या स्वप्नातील गोवा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

फातर्पा, नावेली येथील महिलांनी नोंदवली मते

फातर्पा आणि नावेली येथील हाऊसिंग बोर्ड भागात करण्‍यात आलेल्‍या ‘जनमन उत्‍सव’ सर्वेक्षणातही तेथील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली मते व्यक्त केली.

संपूर्ण राज्यात हे सर्वेक्षण करण्यात येत असून सर्वच ठिकाणी महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नावेली येथील हाऊसिंग बोर्ड आणि फातर्पा येथे झालेल्या सर्वेक्षणाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी बेतूल येथील कपेलवाडा आणि ताकवाडा भागात जाऊन महिलांची मते नोंदवून घेण्यात आली होती. सासष्टी तालुक्याबरोबर केपे, सांगे या भागांतही महिलांकडून प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com