NEET Exam: साडेचार हजार विद्यार्थी देणार 'नीट' परीक्षा; सरकारी यंत्रणा सज्ज, परीक्षा केंद्रांवर कदंबची विशेष बससेवा

NEET Exam Goa 2026: राज्यात येत्या रविवारी (ता. २१) होणाऱ्या ‘नीट’ परीक्षा राज्यातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थी देणार आहेत.
NEET Exam
NEET Exam Goa 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात येत्या रविवारी (ता. २१) होणाऱ्या ‘नीट’ परीक्षा राज्यातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थी देणार आहेत. या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका आणण्यापासून ते उत्तरपत्रिका सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी पोलिसांसह सीआयएसएफ जवानांची मदत प्रशासकीय यंत्रणा घेणार आहे.

त्याशिवाय परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणेसह मोबाईल जॅमर्सही बसविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली.

वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागांसाठी ही परीक्षा महत्त्वाची असते. देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात.

NEET Exam
NEET Exam: 'नीट' पेपरफुटीविरोधात 'टुगेदर फॉर म्हापसा' रस्त्यावर; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

काही दिवसांपूर्वी या परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारने पुनर्परिक्षा घेण्याचे ठरविले, त्यानुसार ही परीक्षा होत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि एनटीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कडक सुरक्षा व्यवस्थेत ही परीक्षा होणार आहे. त्याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे.

कदंब परिवहन महामंडळातर्फे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध असणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना १० ते २० रुपये आकार असेल. म्हापसा बसस्थानकावरून झेवियर कॉलेज व संत सोहिरोबाना आंबिये कॉलेज पेडणे, साखळी बसस्थानावरून सरकारी कॉलेज, पणजी बसस्थानकावरून कुजिरा परिसर, तसेच केंद्रिय विद्यालय मांडवी आणि केंद्रिय विद्यालय बांबोळी येथे बसेस उपलब्ध असतील.

NEET Exam
NEET Paper Leak: 'नीट' पेपरफुटीप्रकरणी आंदोलन, भाजप कार्यालयावर मोर्चा; गोवा काँग्रेस पक्षाकडून जोरदार टीका

...या केंद्रांवर होणार परीक्षा

उत्तर गोव्यात ८ आणि दक्षिण गोव्यात ४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. उत्तर गोव्यातून ३ हजार ३५० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर दक्षिण गोव्यातून १ हजार ७० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. उत्तर गोव्यातील सेंट झेव्हियर्स (म्हापसा), संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय (पेडणे), सरकारी महाविद्यालय (साखळी), रोझरी हायस्कूल (कुजिरा), मुष्टिफंड हायस्कूल (कुजिरा), धेंपो उच्च माध्यमिक स्कूल (कुजिरा), केंद्रीय विद्यालय (आयएनएस मांडवी) आणि केंद्रीय विद्यालय (बांबोळी), तर दक्षिण गोव्यात केंद्रीय विद्यालय (कुर्टी-फोंडा), एनआयटी (कुंकळ्ळी), केंद्रीय विद्यालय क्रमांक १ (वर्णापुरी) आणि केंद्रीय विद्यालय क्रमांक २ (मांगोरहिल).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

JEE Advanced Exam
Together For Mapusa NEET Protest
 NEET Exam Cancellation 2026
12th Supplementary Exam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com