CM Pramod Sawant : मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या कारवाईने सरकारी बाबूंचं धाबं दणाणलं

गोव्यात गेल्या चार वर्षात 8 ते 9 भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं निलंबन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant : गोव्यात सुशासन आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील डबल इंजिन सरकार सतत कार्यरत आहे. गोव्यात कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला स्थान नाही. त्यामुळे गोव्यात गेल्या 4 वर्षात आठ ते दहा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. तसंच यापुढेही अशाप्रकारे कारवाई सुरुच राहणार असल्याचा एक प्रकारे इशारा मुख्यमंत्र्यांनी खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

गोव्यात सध्या दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. त्यामुळे दक्षता खात्याकडे आणि लाचलुचपत खात्याकडे अजूनही 11-12 भ्रष्टाचाराच्या तक्रारी आलेल्या आहेत. गोव्यात कोणत्याही प्रकारचा गैरकारभार खपवला जाणार नसून दोषींवर कडक कारवाईचे संकेत मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहेत.

CM Pramod Sawant
Dangerous Buildings in Goa : गोव्यातील ढासळणाऱ्या धोकादायक इमारतींवर उपाययोजना काय?

एखादी फाईल 10 महिन्यांच्या कालावधीपर्यंत लांबणे हाही एकप्रकारे भ्रष्टाचारच आहे. अशा प्रकारे कामात दिरंगाई करणाऱ्या 8-9 सरकारी अधिकाऱ्यांना आपण निलंबित केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान सार्वजनिक गाऱ्हाणी खात्याकडे 306 तक्रारी नोंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 70 टक्के तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली असून यापुढेही कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलत राहणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com