Singing Competition|वास्कोतील 'नवाब शेख' ठरला राष्ट्रीय चॅम्पियन

गीतगायन स्पर्धेत गोव्याचा (Goa) प्रतिभावंत गायक नवाब शेख राष्ट्रीय चॅम्पियन ठरला आहे. .
goa latest news
goa latest news Dainik Gomantak
Published on
Updated on

- प्रदिप नाईक

राष्ट्रीय विजेता गायकरिद्वार, उत्तराखंड येथे अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गीतगायन स्पर्धेत, वास्कोतील युवा गायक कलाकार नवाब शेख राष्ट्रीय चॅम्पियन ठरला. त्याला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2021- 22 चे सुवर्णपदक व प्रशस्तिपत्र प्राप्त झाले.

हरिद्वारमधल्या देवपुरा येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप गीतगायन स्पर्धेत सबंध देशातून, गायन विभागात अंतिम 53 गायक कलाकारांची निवड प्राथमिक फेरीद्वारे झाली होती. यातील 18 ते 24 या वयोगटात 32 स्पर्धक होते. गोव्याचा (Goa) प्रतिभावंत गायक नवाब शेख याने या गटात गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते.

‘परफॉर्मिंग आर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘साउथ इंडिया सिंगिंग चॅम्पियनशिप संघटना’ यानी 2022 सालच्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी ‘पणजी सम्राट क्लब’च्या सहकार्याने पर्वरी येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत नवाब शेख याची 18 ते 24 वर्षे वयोगटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. हरिद्वार इथे झालेल्या अंतिम फेरीत नवाबने ‘कच्चे धागे’ या चित्रपटामधले (Movie) नुसरत फते अली खॉ यांनी संगीतबद्ध केलेले व सुखविंदर सिंग यांनी गायलेले, ‘उपर खुदा आसमां निचे जहॉ’ हे तसेच ‘रामलीला’ या चित्रपटामधले हरजितसिंह यानी गायलेले, ‘ये लाल इश्क ये मलाल’ अशी दोन गाणी म्हटली.

goa latest news
गायनातील 'नवाब' शेख करणार गोव्याचे प्रतिनिधित्व

नवाब हेडलॅण्ड-सडा येथील संगीत शिक्षक शरद मठकर यांच्याकडून गेली दहा वर्षे शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे. नवाब भावगीते, भक्तिगीते तसेच अभंग-गौळणादी प्रकारही लिलया गातो. यापुर्वी त्याने राष्ट्रीय पातळीवरच्या ऑनलाईन स्पर्धांमधून विजेतेपद पटकावले आहे. ऑफलाईन पद्धतीने आयोजित झालेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या गीतगायन स्पर्धेमधले हे त्याचे पहिलेच विजेतेपद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com