Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Viral Video: एडबर्ग परेरा कथित मारहाण प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Dainik Gomantak
Edberg Pereira Assault CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा कथित मारहाण प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल फुटेजमध्ये पोलिस आणि परेरा यांच्यातील झटापट स्पष्टपणे दिसत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Dainik Gomantak
Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

फुटेजमध्ये काय दिसले?

एडबर्ग परेरा याला गोंधळ घालत असल्याच्या आरोपाखाली नावेली, रोझरी कॉलेजजवळून ताब्यात घेऊन मडगाव टाऊन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. याचदरम्यान, व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये पोलिस कर्मचारी आणि परेरा यांच्यातील झटापट स्पष्टपणे दिसत आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ला केला जात आहे. पोलिस परेराला लाथांनीही मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर (Social Media) हे व्हिडिओ फुटेज वेगाने व्हायरल होत आहे.

Dainik Gomantak
Bolmax Pereira Case: छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बोलमॅक्स परेरांना मोठा दिलासा, गुन्हा रद्द

पीएसआय निलेश वळवईकरांवर कारवाई

त्याचवेळी, या कथित मारहाण प्रकरणी पीएसआय निलेश वळवईकरांवर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत परेरा याला मारहाण करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कलम 115(2) आणि 198 नुसार वळवईकरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरीकडे, या कथित मारहाण प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरणही चांगले तापले आहे. विरोधकांनी पुन्हा एकदा सावंत सरकारला घेरले. आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com