Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Portuguese Panch Navelim: पुढील आदेशापर्यंत निवडणूक पुढे ढकलली आहे, एवढेच संचालकांनी आदेशात म्हटले आहे. संचालकाच्या या आदेशाने नावेलीतील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Court Order, summons
Court Order, summons Canva
Published on
Updated on

सासष्टी: नावेलीच्या सरपंचांची निवड गुरुवार, ४ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. पण पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी आदेश काढून ही निवडणूक पुढे ढकलली. बुधवारी जारी केलेल्या आदेशात निवडणुक पुढे ढकलण्याचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

तरी पंचायतीतील दोन पंच मिंगेल (मायकल) कार्दोज व रॉबिन रॉड्रिग्स हे पोर्तुगीज नागरिक असल्याचे व त्यांच्याविरोघात इतर काही पंचांनी तक्रार केल्याने व ते दोघेही अपात्र होण्याची शक्यता असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी या प्रतिनिधिला सांगितले.

हे दोघेही पंच पंचायतीच्या कामात ढवळाढवळ करीत होते. त्यांच्या विरोधात खटला चालू आहे, असेही तुयेकर यांनी सांगितले. उपसरपंच वेलिंडा आफोंसो यांच्याकडे सध्या पंचायतीचा ताबा आहे, असेही त्यांनी सांगितले.

Court Order, summons
Navelim: जमिनींच्या प्लॉटींगच्या मुद्द्यावर नावेलीची ग्रामसभा तापली, प्रक्रिया बंद करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस

पुढील आदेशापर्यंत निवडणूक पुढे ढकलली आहे, एवढेच संचालकांनी आदेशात म्हटले आहे. संचालकाच्या या आदेशाने नावेलीतील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी पंच सदस्यांना बुधवार, २ रोजी सांगितले.

पंच पॉल परेरा हे सरपंचपदासाठी इच्छुक होते. मात्र, या आदेशावर त्यांनी आश्र्चर्य केले. दरम्यान, पॉल परेरा यांनी पंच सदस्यांसोबत पंचायत संचालकाकडे शिष्टमंडळ नेण्याचा विचार चालविला आहे.

Court Order, summons
Navelim: आणखी एक निकृष्ट काम! मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये गळती; बॅडमिंटन फ्लोअर खराब होण्याची भीती

महिन्याभरात निवड शक्य

मायकल कार्दोज याने सरपंचपदाचा राजीनामा देऊन एका महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. गोवा पंचायत कायद्यानुसार पंचायत संचालकाला सरपंचाची निवड करण्यासाठी ६० दिवसांची मुदत आहे. त्यामुळे पुढील एका महिन्याच्या आत संचालक कधीही सरपंच निवडण्यासाठी निवडणूक जाहीर करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com