Nava Somvar Utsav: डिचोलीत ‘नवा सोमवार’; शांतादुर्गेच्या उत्सवानिमित्त शहरात स्वरांची बरसात

Nava Somvar Utsav Bicholim: श्री शांतादुर्गा देवीचा जयघोष आणि हजारो भाविकांच्या साक्षीत डिचोलीतील ‘नवा सोमवार’ उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. मंगळवार, १० रोजी पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे या उत्सवाची सांगता होणार आहे.
Nava Somvar Utsav Bicholim
Nava Somvar Utsav BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Nava Somvar Utsav 2024

डिचोली: श्री शांतादुर्गा देवीचा जयघोष आणि हजारो भाविकांच्या साक्षीत डिचोलीतील ‘नवा सोमवार’ उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. मंगळवार, १० रोजी पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे या उत्सवाची सांगता होणार आहे. डिचोलीचा ‘नवा सोमवार’ उत्सव संपूर्ण राज्यासह राज्याबाहेर प्रसिद्धीस पावलेला आहे. नवा सोमवार उत्सवानिमित्त संपूर्ण शहर मंगल आणि भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले आहे.

नवा सोमवारनिमित्त सकाळपासूनच भाविकांची पावले देवीच्या मंदिरांकडे वळत होती. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर गर्दी वाढत होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही रात्री डिचोलीत भक्तांचा महापूर लोटला होता. ‘नवा सोमवार’ उत्सवानिमित्त गायनांच्या मैफलींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रभर शहरात स्वरांची बरसात झाली. रसिकांनी या मंत्रमुग्ध करणाऱ्या मैफलींचा आस्वाद घेतला.

Nava Somvar Utsav Bicholim
Morjim Crime: चिंताजनक! 'जमीन व्यवहारा'तून एकावर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून उशिरा गुन्हा दाखल

स्वरधारांची बरसात

नामवंत गायकांच्या गायन मैफिली हे नवा सोमवार उत्सवाचे वैशिष्ट्य. समृद्ध चोडणकर निर्मित ''ॐकार स्वरूपा'' हा नाट्य, भक्ती आणि भावगीत गायनाचा कार्यक्रम रंगला. या मैफिलीत इंडियन आयडॉल फेम अभिषेक तेलंग आणि ''सूर नवा, ध्यास नवा'' फेम संज्योती जगदाळे (मुंबई ) या कलाकारांनी भाग घेतला होता. अनुश्री फडणीस देशपांडे यांनी निवेदन केले. आतीलपेठ येथील श्री शांतादुर्गा मठ मंदिरात गुरुफंड ट्रस्ट आणि भायलीपेठ बाजारकर दहाजण मंडळातर्फे नवा सोमवार उत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पाडल्यानंतर रात्री परंपरेप्रमाणे पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला.

Nava Somvar Utsav Bicholim
Cash For Job Scam : छुपे चेहरे समोर येणार? नोकरी घोटाळा प्रकरणात EDची चौकशी सुरु; केस फाइल्सची मागणी

स्वच्छतादूतांकडून प्लास्टिक टाळण्याचा विक्रेत्यांना संदेश

‘नवा सोमवार’निमित्त आज सायंकाळी डिचोलीतील स्वच्छतादूतांनी शहरात स्वच्छतेविषयी जागृती केली. ‘प्लास्टिक टाळा आणि स्वच्छता राखा’ असा संदेशही या स्वच्छतादूतांनी फेरीत स्टॉल थाटलेल्या विक्रेत्यांना दिला.

नवा सोमवारनिमित्त दरवर्षी शहरात विविध दुकानांची मोठी फेरी भरत असते. फेरीत स्टॉल थाटणारे काही विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतानाच टाकाऊ वस्तू मिळेल त्याठिकाणी टाकतात. त्यामुळे शहरात कचऱ्यासह अस्वच्छता निर्माण होत असते. या प्रकारावर नियंत्रण यावे म्हणून पालिकेच्या सहकार्याने स्वच्छतादूतांनी आज शहरात जागृती केली. नगरसेवक विजयकुमार नाटेकर, यांच्यासह कॅजिटन वाझ, रामचंद्र पळ, व्यंकटेश नाटेकर, राधिया देसाई, वनश्री चोडणकर, श्रीकुमार, रामा देसाई, रोहिदास पळ आदी स्वच्छतादूत या जागृती अभियानात सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com