Nav India Literacy Programme
Nav India Literacy ProgrammeDainik Gomantak

Goa News: राज्यात नव भारत साक्षरता कार्यक्रम

Goa News: राज्य शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यात नव भारत साक्षरता कार्यक्रमाला सुरवात झाली आहे.
Published on

Goa News: राज्य शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यात नव भारत साक्षरता कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय साक्षरता दिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.

Nav India Literacy Programme
Goa Ganesh Chaturthi 2023: वाळपईत चतुर्थी बाजाराला सुरवात स्वयंरोजगाराला मिळेल संधी : शेख

यात सरकारी प्राथमिक विद्यालय पिळये, धारबांदोडा येथे साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी शेट्ये आणि प्रौढ संसाधन प्रशिक्षण समन्वयक आरती जाधव यांची उपस्थिती होती.

यावेळी इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी खास चित्रकला स्पर्धा घेण्यात आली शिक्षक कमलाकर देसाई यांनी मुलांना साक्षरता दिवसावर माहिती देऊन शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. तसेच यावेळी मुलांनी गावातून प्रभात फेरी काढली. या कार्यक्रमाअंतर्गत सासष्टी व डिचोली या भागातही साक्षरता दिवस साजरा करण्यात आला.

दरम्यान या कार्यक्रमाअंतर्गत निरांकाल फोंडा येथील वानरमारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या प्रौढांसाठी साक्षरता कार्यक्रम राबवला जात आहे. आठवड्यातून दोन दिवस वस्तीवर जाऊन प्रौढांना मूलभूत शिक्षण देण्याचे सुरु केले आहे.

दरम्यान, या वर्गासाठी साखळीतील संवेदन केंद्राची त्यांना मदत मिळत आहे. संवेदन केंद्रातर्फे कातकरी वस्तीत दुपारच्या वेळी शाळकरी मुलांना मूलभूत शैक्षणिक शिकवणी करण्याचे वर्ग चालतात. त्यावेळी त्यांच्या साथीने प्रौढ संसाधन प्रशिक्षण समन्वयक आरती जाधव यांच्यातर्फे कातकरी प्रौढ वर्ग चालवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com