नैसर्गिक जलस्रोत बनताहेत दूषित; मोठी समस्‍या

दुर्लक्ष आणि लोकसंख्येची वाढती घनता ही प्रमुख कारणे
Well
WellDainik Gomantak
Published on
Updated on

धीरज हरमलकर

प्रतिचौरस किलोमीटर लोकसंख्येच्या घनतेत झालेली प्रचंड वाढ, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची ओलांडून गेलेली क्षमता व नैसर्गिक जलस्त्रोत विनावापर पडून राहणे ही नैसर्गिक जलस्रोत दूषित होण्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्‍यामुळे जलस्त्रोत विभाग राज्यातील नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याच्या मोहिमेवर आहे.

Well
Sattari News : सत्तरीत भाजीपाला लागवडीवर भर; स्वयंरोजगाराकडे ‘पाऊल’

गेल्या काही वर्षांपासून राज्यात उन्हाळ्यामध्‍ये पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. दरवर्षी भूजल पातळी खाली जाते आणि गोड पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत उन्हाळ्यात झपाट्याने कोरडे होतात. गोव्यात सरोवरे, नाले, विहिरी, झरे, धबधबे इ. नैसर्गिक ताज्या पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहेत. नैसर्गिक जलस्रोतांच्या या विनाशामागील कारणे धक्कादायक आहेत.

याबाबत ‘गोमन्‍तक’शी बोलताना जलस्रोत विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले की, काही खडकाळ भागात पावसाळ्यात भूजल दूषित होणे आणि सांडपाणी ओसंडून वाहणे या घटना दिसून येतात. यामागील मुख्य कारण म्हणजे प्रतिचौरस किलोमीटर लोकसंख्येच्या घनतेत झालेली कमालीची वाढ होय.

राज्यांचे काही भाग जे खडकाळ भूप्रदेश आहेत, तेथे सांडपाण्याचे पाणी व्यवस्थित झिरपत नाही आणि त्यामुळे हे पाणी पृष्ठभागावर येते. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीची पाणी शोषून राखण्याची क्षमता ओलांडली की जमीन जास्त पाणी धरू शकत नाही आणि त्यामुळे सांडपाणी उलटते.

Well
Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळ झाले अत्याअधुनिक, अशी सुविधा वापरणारे आशिया खंडातील ठरले पहिलेच विमानतळ

150 तलाव, नैसर्गिक झरे करणार पुनरुज्जीवित

भूजल पातळी आणि विहिरी, झरे इत्यादी ताज्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित होण्याबाबत प्रमोद बदामी यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी बहुसंख्य लोक विहिरी, झऱ्यांचा वापर करायचे. त्यामुळे या स्रोतांची चांगली देखभाल व्‍हायची.

पण आता प्रत्येक घरात नळाच्या पाण्याची जोडणी आल्यामुळे जलस्रोतांच्या या नैसर्गिक स्रोतांकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्‍यांना जीवदान देण्यासाठी विभागाने काय पावले उचलली आहेत असे विचारले असता,

बदामी म्‍हणाले की, ‘अमृत सरोवर’ या योजनेअंतर्गत विभागाने 150 तलाव आणि अनेक नैसर्गिक झरे पुनरुज्जीवित करण्याचा, पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नितळ बाय, नितळ गोंय’ योजनेअंतर्गत निधी देऊन त्यांच्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विभाग लोकांना प्रोत्साहन देत आहे.

काही खडकाळ भागात पावसाळ्यात भूजल दूषित होणे आणि सांडपाणी ओसंडून वाहणे या घटना दिसून येतात. यामागील मुख्य कारण म्हणजे प्रतिचौरस किलोमीटर लोकसंख्येच्या घनतेत झालेली कमालीची वाढ होय.

प्रमोद बदामी, जलस्रोत विभागाचे मुख्य अभियंता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com