पणजी: नाटो सदस्य इटली आणि भारतीय नौदलाने सहा दिवस गोव्यातील समुद्रात पहिल्यांदा संयुक्त सराव केला. या ऐतिहासिक सरावात दोन्ही देशांनी विमानवाहू नौका समुद्रात उतरवल्या होत्या. भारतीय नौदलने सोशल मिडिया एक्सवर याबाबत माहिती दिली. ०१ ते ०६ ऑक्टोबरदरम्यान गोवा समुद्रात हा सराव पार पडला.
भारताने आयएनएस विक्रमादित्य आणि इटलीने आयटीएस केव्हर उतरवल्या होत्या, यासह दोन युद्धनौका देखील समुद्रात दाखल करण्यात आल्या होत्या.
०१ ऑक्टोबर रोजी दक्षिणपश्चिम समुद्रकिनाऱ्यावर इटलीची केव्हर नौका दाखल झाली. इटलीची भेट आंतरराष्ट्रीय आंतराळ सुरक्षा आणि समुद्रात मुक्त विहार सुनिश्चित करते, असे नवी दिल्ली येथील इटलीच्या दूतावासाने म्हटले आहे.
इटली आणि भारताच्या द्विपक्षीय सहकार्याच्या अजेंड्यामध्ये संरक्षण हे अग्रस्थानी आहे, असेही त्यात म्हटले आहे.
भारत आणि इटलीच्या नौदल दलांनी वाहक-आधारित लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसह ऑपरेशन्स केले, यात एकत्रित मोठ्या सैन्याचा सहभाग, हवाई लढाऊ मोहिमा, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, शोध-आणि-बचाव मोहिमा, समन्वित शस्त्रे गोळीबार आणि संयुक्त युद्धाभ्यास यांचा समावेश होता.
भारतीय सागरात चीनची उपस्थिती वाढल्यानंतर भारतीय नौदल देखील सतर्क झाले आहे. याचाच भाग म्हणून इटलीसोबत पार पडलेला संयुक्त सराव. युरोप आणि आशियात जाण्यासाठी हा महत्वाचा सागरी मार्ग असल्याने मार्गावरील सुरक्षा भारताची जबाबदारी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.