Aryan Khan Goa Shoot: एसआरकेच्या लेकाचं गोव्यात 'स्टारडम' शूट; अभिनेत्री मोना सिंगही साकारणार भूमिका

Aryan Khan Goa Shoot: शाहरुख खानचा मुलगा आर्यन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे, त्याच्या नव्या सिरीजचे सध्या गोव्यात चित्रीकरण सुरु आहे.
Aryan Khan Goa Shoot
Aryan Khan Goa ShootSocial Media
Published on
Updated on

Aryan Khan Goa Shoot

बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा, आर्यन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. आर्यनच्या नव्या प्रोजक्टचे सध्या गोव्यात शूटींग सुरु झाले असून, अभिनेत्री मोना सिंगही आर्यनच्या या प्रोजक्टमध्ये भूमिका साकारणार आहे.

आर्यन दिग्दर्शन करत असलेल्या या सिरीजचे नाव 'स्टारडम' असून, लवकरच ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री मोना सिंग नुकतेच या सिरीजच्या चित्रीकरणासाठी गोव्यात दाखल झाली असून, चित्रीकरण मोठ्या कालावधीसाठी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विविध माध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्टारडम खूप उत्तम प्रोजेक्ट असून, काहीतरी वेगळं करण्याचा आनंद असल्याचे मोना सिंगने म्हटले आहे. मोना सध्या आर्यनसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याची सूत्रांनी म्हटलंय.

यापूर्वी स्टारडमचे दिल्ली आणि मुंबईत चित्रीकरण झाले असून, उर्वरीत गोव्यात होत आहे. गोव्यात शूट अधिककाळ होण्याची शक्यता आहे.

Aryan Khan Goa Shoot
Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

दरम्यान, मोना सिंगच्या स्टारडममधील भूमिकेबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, स्टारडमबाबत सध्या गुप्तता पाळली जात आहे.

आर्यनने हा प्रोजेक्ट सध्या फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसत असून, तो शक्य तेवढी सर्व गुप्तता पाळताना दिसत आहे. सेटवरील फोटो, व्हिडिओ ऑनलाईन लिक होणार नाहीत याची काळजी घेत आहे.

आर्यन सिरिजमधील सर्व कलाकारांना भूमिका समजावून सांगण्यासह चित्रीकरण व्यवस्थित पार पडले याची काळजी घेत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com