CM Pramod Sawant : राज्यातील प्रवासी मार्गांचे राष्ट्रीयीकरण सर्वांच्या हिताचे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं वक्तव्य; पुढील विजया दशमीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणार
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant : कदंबची सरकारी आणि खासगी बससेवेला धक्का न लावता राज्यातील आणखी काही  प्रवासी मार्गांचे  राष्ट्रीयीकरण करणे सर्वांच्या हिताचे आहे. येत्या वर्षभरात ते केले जाईल. केंद्राच्या गतिशक्ती योजनेनुसार स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांना सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल, अशा मल्टीमोड वाहतुकीला पर्याय नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कदंब वाहतूक महामंडळाच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर, संचालक उज्ज्वला नाईक, महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे, वाहतूक संचालक राजन सातार्डेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महामंडळाच्या बस गाड्यांबरोबर खासगी क्षेत्रातील बस गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी घेवू. शिवाय राज्यातील महत्त्वाच्या मार्गांचे राष्ट्रीयकरण करून तेथील प्रवाशांसाठी त्या उपलब्ध करून दिल्या जातील.  पुढील विजयादशमीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. महामंडळासाठी आणखी शंभर इलेक्ट्रिकल बस दिल्या जातील. या बस आल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना आम्ही सेवेतून कमी करणार नाही. त्यांना सेवेत ठेवले जाईल.

गतिशक्ती योजनेचा लाभ

राज्याची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारच्या गतिशक्ती योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला जाईल. यानुसार दळणवळणाची इतर साधने रेल्वे, विमान  यांच्यासाठीच्या साधन सुविधा उभारल्या जातील. वाहतूक सुधारण्यासाठी बस गाड्यांबरोबर, टॅक्सी, रिक्षा, दुचाकी पायलट या सुविधाही सक्षम करण्यात येणार आहेत. यासाठी केंद्राच्या गतिशक्ती योजनेचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Goa CM Pramod Sawant
Politics in Madgaon Municipality : मडगाव पालिकेत लोकशाहीची विटंबना होतेय का?

 कदंब पहिल्या गाडीसोबत नव्या गाडीची पूजा

प्रवाशांच्या वाहतुकीसाठी 42 वर्षांपूर्वी कदंब महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी घेतलेली जीडीएक्स-1 या नंबरच्या बसची पूजा करण्याची परंपरा महामंडळाच्या वतीने कायम आहे. अर्थात सध्या ही बस वापरात नाही. काळानुरूप त्या जागी आता नव्या बसगाड्या आल्या. नव्या इलेक्ट्रिकल बसेस आल्याने या डिझेल बसही आता मागे पडत आहेत. मात्र, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात महामंडळातर्फे इलेक्ट्रिकल बसेसचीही पूजा केली जात आहे.

डिजिटलायझेशन आणि कमांड कंट्रोल रूम

महामंडळाच्या सर्वच व्यवहारांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. यामध्ये क्यूआर कोड, कार्ड पेमेंट, डिजिटल तिकीट सुरू आहे. इतर सुविधा डिजिटल करून महामंडळ पेपरलेस करण्याचा प्रयत्न आहे. कमांड कंट्रोल रूमद्वारे सर्वच बसगाड्यांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था लवकरच सुरू होईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष तुयेकर यांनी दिली.

मार्ग राष्ट्रीयीकरण म्हणजे काय ?

प्रवासी वाहतुकीच्या मार्गांचे राष्ट्रीयीकरण म्हणजे त्या मार्गावरील प्रवास वाहतुकीचे सर्व हक्क सरकारच्या मालकीचा होणे होय. या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसगाड्या भाडेतत्त्वावर सरकारच्या कदंब महामंडळाच्या नियंत्रणात आणून त्या त्यांच्याकडून वापरून घेणे. त्या गाड्यांची मालकी त्यांच्याकडेच राहील पण नियंत्रण सरकारकडे असेल. याचा दुहेरी लाभ शक्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com