Goa Sand Mining: वाळू उत्खननासाठी गोव्यातील 4 नद्यांचा अभ्यास; NIO ने केला अभ्यास; अहवाल सरकारला सादर

Goa Sand Mining: मांडवी, झुआरी, शापोरा, तेरेखोल नद्यांचा समावेश
NIO Studies 4 Rivers in Goa for sand mining
NIO Studies 4 Rivers in Goa for sand miningDainik Gomantak

NIO Studies 4 Rivers in Goa for sand mining : गोव्यातील दोना पावला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) या संस्थेने राज्यातील चार नद्यांचा भूगर्भीय, भूभौतिक आणि जैविक अभ्यास पूर्ण केला असून त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे.

मांडवी, झुआरी, शापोरा आणि तेरेखोल या नद्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे, असे कळते.

मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील सर्व प्रमुख नद्यांचा अभ्यास केला जात आहे. आत्तापर्यंत मांडवी, झुआरी, शापोरा आणि तेरेखोल नद्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. मान्सूनपूर्व अभ्यास केला गेला आहे. मान्सूननंतरचा अभ्यास अद्याप बाकी आहे.

भूगर्भीय, भूभौतिकीय, जैविक अभ्यासातून गाळ कोठे साचतो, वाळू उत्खननासाठी योग्य जागा कोणती, हे कळणार आहे. हा अहवाल गोवा सरकारला सादर केला आहे.

NIO Studies 4 Rivers in Goa for sand mining
Goa Students Eye Surgery: गोव्यातील 300 शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर होणार शस्त्रक्रिया

म्हापसा, वाळवंटी, खांडेपार, सिकेरी आणि कुंभारजुवा या इतर नद्यांचाही अभ्यास करण्याची जबाबदारी याच संस्थेला देण्यात आली आहे.

बहुतांश वाळू नदीत पावसाळ्यात येते. वाळू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आणि नंतर अशा दोन ऋतूंमध्ये अभ्यास करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) ने वाळू उत्खननासाठी 13 प्रदेश निश्चित्त केले होते. त्यात मांडवी नदीकाठी आठ होते आणि पाच झुआरी नदीच्या किनारी होते. हे एकूण 67.45 हेक्टर क्षेत्र होते जिथे वाळू उत्खनन सोयीचे आहे.

केवळ पारंपारिक (मॅन्युअल) पद्धतीने वाळू उत्खननाची शिफारस करताना, NIO ने त्यांच्या अहवालात या झोनमध्ये अंदाजे 11.17 लाख घनमीटर वाळूचे प्रमाण नोंदवले होते.

NIO Studies 4 Rivers in Goa for sand mining
Goa Agriculture Policy: शॅक धोरणानंतर आता कृषी धोरण; जानेवारीपर्यंत तयार होणार राज्याची अ‍ॅग्रीकल्चर पॉलिसी

NIO ने आपल्या अहवालात सर्व 13 प्रदेशांचे 20 झोनमध्ये वर्गीकरण केले होते. त्यातील मांडवी आणि झुआरी नद्यांवर प्रत्येकी 10 झोन आहेत.

दरम्यान, 2019 मध्ये, सरकारने NIO कडे राज्यातील सर्व नद्यांची दूषित पातळी, प्रदूषणाचे स्रोत ओळखण्यासाठी आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्याचे काम सोपवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com