National Games Goa 2023: मल्लखांबमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम! रुपाली गंगावणेने पटकावली 4 सुवर्ण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सर्व सुवर्णपदके महाराष्ट्र संघाला
National Games Goa 2023
National Games Goa 2023Dainik Gomantak

अनिल पाटील

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या एकूण पदकांच्या यादीत आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राच्या संघाने मल्लखांब स्पर्धेतील सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदके जिंकत आपला दबदबा कायम ठेवला आहे. मुंबईच्या रूपाली गंगावणे हिने ४ सुवर्णपदके जिंकून आपला जुना रेकॉर्ड मोडला आहे. स्पर्धेतील सांघिक विजेतेपदासह सर्वसाधारण विजेतेपदाबरोबर महिला आणि पुरुष गटातील सर्व सुवर्णपदके महाराष्ट्र संघाने जिंकली आहेत.

National Games Goa 2023
Goa Petrol-Diesel Prices: टाकी फुल्ल करण्याआधी जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक ऍड संजय केकाण म्हणाले या स्पर्धेसाठी संघातील खेळाडूने घेतलेले कष्ट यशस्वी झाले आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आम्ही नाशिकच्या यशवंत व्यायामशाळेत घेतलेले दहा दिवसांचे शिबिर अधिक उपयुक्त ठरले.

यादरम्यान खेळाडूंना नियमित सरावासह मेडिटेशन, विविध प्रकारच्या थेरिपी दिल्या याशिवाय डायटवर भर देण्यात आला याचा अंतिम परिणाम या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दिसून आला आम्ही स्पर्धेतील सर्वच्या सर्व सुवर्णपदके जिंकून जिंकली याशिवाय १ रौप्य ३ ब्रान्झ अशी १३ पदके महाराष्ट्र संघाने जिंकली आहेत. या स्पर्धेत मध्यप्रदेशने ७ रौप्य आणि तमिळनाडू संघाने १ रौप्य पद जिंकत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

विजयाचे मानकरी

महिलांच्या संघात रूपाली गंगावणे, सई शिंदे, नेहा क्षीरसागर, पल्लवी शिंदे, निधी राणे आणि जान्हवी जाधव यांचा समावेश होता.या सर्वांनी सुवर्ण पदके जिंकली प्रशिक्षक म्हणून प्रणाली जगताप यांनी काम पाहिले तर पुरुषांच्या गटात दीपक शिंदे, आदित्य पाटील, शुभंकर खवले, ऋषभ घुबडे, अक्षय तरल, कृष्णा आंबेकर यांचा समावेश होता. तर प्रशिक्षक म्हणून स्वप्निल खेसे यांनी काम पाहिले.

रूपालीने जिंकली ४ सुवर्ण

या स्पर्धेत रूपाली गंगावणे हिने ४ सुवर्णपदके जिंकले. यापूर्वी गुजरात - अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने ३ सुवर्णपदके जिंकली होती. यंदा सांघिक कामगिरीसह वैयक्तिक गटात तिने तिन्हीही मलखांमधील सुवर्णपदके जिंकल्याने ती चर्चेचा विषय बनली होती. रूपाली गेली २० वर्षे मुंबईच्या चेंबूर येथील जवाहर विद्याभवन येथे सराव करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com