National Games 2023 ची मशाल गोव्याची विंड सर्फर कात्या कोएल्हो पंतप्रधान मोदींकडे करणार सुपूर्द

उद्घाटन सोहळ्यात सुखविंदर सिंग, हेमा सरदेसाई सादरीकरण करणार
Katya Coelho to hand over torch of National Games to PM Narendra Modi
Katya Coelho to hand over torch of National Games to PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

National Games 2023: गोव्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची क्रीडा ज्योत गोव्याची विंड सर्फर कात्या कोएल्हो (Katray Coelho) हीच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी ही माहिती दिली. गोव्यात जन्मलेली कात्या कोएल्हो ही व्यावसायिक विंडसर्फर आहे.

फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये गुरुवारी 26 ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात ही क्रीडा ज्योत सुपूर्द करण्यात येणार आहे. पाच तास हा भव्य उद्घाटन सोहळा चालणार आहे.

Katya Coelho to hand over torch of National Games to PM Narendra Modi
Delta Corp: उच्च न्यायालयाचा डेल्टा-कॉर्पला दिलासा; 16,195 कोटीच्या कर नोटिसांवर अंतिम आदेश देण्यास प्रतिबंध

यात पार्श्वगायक सुखविंदर सिंग आणि गायिका हेमा सरदेसाई यांच्यासह नामवंत कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.

तसेच यावेळी स्पर्धेत सहभागी 28 संघांची ऍथलीट परेड होईल. तसेच 600 कलाकार राष्ट्रीय एकात्मता या विषयावर सादरीकरण करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, उद्घाटन समारंभाला 12,000 लोक उपस्थित राहतील. त्यातील 5,000 विद्यार्थी असतील. याशिवाय अरुणाचल प्रदेश, आसाम आणि ओडिशा राज्यांचे क्रीडा मंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आम्ही 2009 पासून या खेळांचे आयोजन करण्याची वाट पाहत होतो. 12 वर्षांनंतर आम्ही या खेळांचे आयोजन करत आहोत.

Katya Coelho to hand over torch of National Games to PM Narendra Modi
Goa Temperature: गोव्यात ऑक्टोबर हीटला सुरवात; पणजीत कमाल तापमानाची नोंद

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, "गोवा चित्रपट महोत्सवासारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. परंतु हा कार्यक्रम इफ्फीपेक्षा मोठा असेल. सुमारे 10,000 खेळाडू या कार्यक्रमात सहभागी होतील.

दरम्यान, 9 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com