National Games 2023: गोव्याच्या कात्या, डेन, रजत, साक्षी यांना सुवर्णपदक; गोव्याच्या सुवर्णपदकांची संख्या 16 वर

राज्याला आत्तापर्यंत एकूण पदके 55 पदके
Katya Coelho | Rajat | Sakshi Choudhary
Katya Coelho | Rajat | Sakshi ChoudharyDainik Gomantak
Published on
Updated on

National Games Goa 2023: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धते यजमान गोव्याच्या खातात बुधवारी 08 नोव्हेंबर 2022 रोजी आणखी चार सुवर्णपदकांची भर पडली. आता गोव्याच्या सुवर्णपदकांची संख्या 16 वर गेली आहे तर राज्याला आत्तापर्यंत एकूण 55 पदके मिळाली आहेत.

खराब हवामानामुळे दोना पावला येथील हवाई बीचवरील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यॉटिंग शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत गोव्याला 4 पदके मिळाली.

Katya Coelho | Rajat | Sakshi Choudhary
Antonio Costa: पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांचा राजीनामा; गोव्याशी आहे घनिष्ठ संबंध...

कात्या कुएल्हो व डेन कुएल्हो यांना सुवर्णपदक तर अद्वैत मेननला रौप्य आणि पर्ल कोलवाळकर हिला ब्राँझपदक मिळाले.

गोव्याची पदक संख्या आता एकूण 55 वर पोहचली आहे. यात 14 सुवर्ण, 13 रौप्य, 28 ब्राँझपदकांचा समावेश आहे.

बॉक्सिंगमध्ये रजत, साक्षीला सुवर्ण

बॉक्सिंगमध्ये गोव्याला दोन सुवर्णपदके मिळाली आहेत. पुरुष लाईट मिडलवेट गटात गोव्याच्या रजतने आणि महिला गटात गोव्याची बॉक्स साक्षी चौधरीने यांनी सुवर्णपदक पटकावले.

रजतने अंतिम लढतीत सेनादलाच्या आकाश याच्यावर विजय मिळवला. तर साक्षीने मध्यप्रदेशच्या मलायका हिचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली. गोव्याने या स्पर्धेत एकूण 16 सुवर्णपदके कमावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com