Antonio Costa: पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांचा राजीनामा; गोव्याशी आहे घनिष्ठ संबंध...

भ्रष्टाचाराचे आरोप; भाषणावेळी कोस्टा यांना अश्रू अनावर
Antonio Costa
Antonio Costagoogle image

Portugal PM Antonio Costa Resigned: पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात, पोर्तुगीज पोलिसांनी मंगळवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर छापा टाकला होता.

अँटोनियो हे भारतीय मूळाचे नेते आहेत. कोस्टा हे गोवन वंशाचे आहेत. गोव्यातील लेखक ओरलँडो दा कोस्टा यांचे ते पुत्र आहेत. कोस्टा हे तिसऱ्यांदा पोर्तुगाल पंतप्रधान बनले होते. ते 2015 पासून या पदावर होते.

Antonio Costa
Yuri Alemao: राज्यात 92 शाळा असुरक्षित; विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका; मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक मंदिरे सांभाळावीत...

पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांचे चीफ ऑफ स्टाफ व्हिटर एस्केरिया यांना पोलिसांनी अटकही केली. त्यानंतर कोस्टा यांनी राजीनामा दिला. पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांनी कोस्टा यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

गुरुवारी राज्य परिषदेच्या बैठकीनंतर ते देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, कोस्टा यांनी ते निर्दोष असल्याचे सांगत कुटुंबासह त्यांना मानणाऱ्यांचे तसेच अनेक वर्षांपासून समर्थन केल्याबद्दल आभार मानले.

पोर्तुगालच्या उत्तरेकडील सीमेजवळील लिथियम खाणी आणि दक्षिणेकडील किनारपट्टीवरील ग्रीन हायड्रोजन प्लांट आणि डेटा सेंटर योजनेत त्यांच्या अधिकाऱ्यांच्या गैरवापराबद्दल तपास केला जात आहे.

Antonio Costa
Goa Rain: गोव्याला अवकाळी पावसाचा तडाखा; रिपरिप सुरूच, आगामी 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा IMD चा अंदाज

टीव्हीवरील आपल्या भाषणात ते म्हणाले, मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. माझ्या विवेकबुद्धीला न पटल्याने राजीनामा दिला आहे. कोणतेही अवैध कृत्य माझ्या अंतरआत्म्यापेक्षा मला मोठे वाटत नाही. मी गुन्हेगारी कारवाईचा विषय बनलो आहे.

हे आश्चर्यकारक आहे. कोणतेही बेकायदेशीर कृत्य माझ्या विवेकबुद्धीला पटणारे नाही. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा महत्वाची आहे. या परिस्थितीत साहजिकच मी राजीनामा दिला आहे.

तपास न्यायाधीशांनी महापौरांसह तिघांविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. मंत्री जोआओ गालांबा आणि देशाच्या पर्यावरण संस्थेचे प्रमुख यांच्यावरदेखील संशय व्यक्त केला गेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com