National Education Policy: नव्या धोरणात अनुभवात्मक शिक्षणाला अधिक प्राधान्य

प्रायोगिक शिक्षण ही एक व्यस्त शिक्षण प्रक्रिया आहे, ज्याद्वारे विद्यार्थी कृतीतून शिकतात आणि अनुभवावर लक्ष केंद्रित करतात, असे उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेंकर यांनी सांगितले.
Goa Education
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

National Education Policy: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने शिफारस केलेला अध्ययन-अध्यापनांचा एक घटक म्हणून अनुभवात्मक शिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे,असे उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेंकर यांनी सांगितले.

उच्च शिक्षण संचालनालय, पर्वरी आणि गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद आणि केंद्र फॉर क्रिएटिव्ह लॅब आयआयटी, गांधीनगर यांच्या संयुक्‍त‍ विद्यमाने गोव्यातील महाविद्यालयांमधील अध्यापकांसाठी अनुभवी शिक्षण या उपक्रमांतर्गत विभाग विकास कार्यक्रमाचे (एफडीपी) उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

Goa Education
Goa News: म्हादई, कोळसा हाताळणीमुळे आता ‘करा वा मरा’ची वेळ

प्रायोगिक शिक्षण ही एक व्यस्त शिक्षण प्रक्रिया आहे, ज्याद्वारे विद्यार्थी कृतीतून शिकतात आणि अनुभवावर लक्ष केंद्रित करतात,असेही ते म्हणाले.

अनुभवात्मक शिक्षण प्रणालीचा भाग म्हणून हा सोहळा नुकताच गोवा विद्यापीठ रसायनशास्त्र विभागात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून गोवा स्टेट रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. जनार्थनम् उपस्थित होते. प्रो. नियॉन मार्शेन यांनी स्वागत केले.

Goa Education
Bus Service: गोव्यात हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा पुन्हा होणार सुरू

अशी आहेत उद्दिष्टे

विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणे, कौशल्य विकसित करणे आणि मूल्ये स्पष्ट करणे ही विभाग विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे आहेत. सर्जनशीलतेला प्रोत्‍साहन आणि चौकटीबाहेरचे विचार यांना महत्त्व दिले जाणार आहे. विविध उपक्रम, कथा आणि मॉडेल्स वापरून अभ्यासक्रम विषयांत गुंतणे, प्रकल्प आधारित शिकविणे आदी कृतिशील कार्यक्रम या उपक्रमांतर्गत राबविले जाणार आहेत.

अध्यापकांसाठी उपयुक्‍त प्रणाली

प्रस्तावित विभाग विकास कार्यक्रम अध्यापकांना एक सुनियोजित, पर्यवेक्षित आणि मूल्यांकन केलेला अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम तयार करण्यास मदत करेल. यामुळे आंतरविद्याशाखीय शिक्षण, नागरी सहभाग आणि करियर विकास, सांस्कृतिक जागरूकता, नेतृत्व आणि इतर व्यावसायिक आणि बौद्घिक कौशल्यांना प्रोत्साहन हे विभाग विकास कार्यक्रमांतर्गत साध्य होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com