Goa News: म्हादई, कोळसा हाताळणीमुळे आता ‘करा वा मरा’ची वेळ

म्हादई प्रश्न, वाढीव कोळसा हाताळणी आणि किनारपट्टी व्यवस्थापनात ढवळाढवळ या तिन्ही प्रस्तावांविरोधात लढा उभारणे आमच्यासाठी महत्वाचे आहे, असे पर्यावरण प्रेमी अभिजित प्रभुदेसाई यांनी म्हटले आहे.
Mahadayi |Coal Transportation |Goa Issue
Mahadayi |Coal Transportation |Goa Issue
Published on
Updated on

Goa News: म्हादई प्रश्न, वाढीव कोळसा हाताळणी आणि किनारपट्टी व्यवस्थापनात ढवळाढवळ हे तिन्ही मुद्दे म्हणजे गोवा पुंजीपतीकडे गहाण ठेवण्याचे कारस्थान आहे, असा आरोप पर्यावरण प्रेमी अभिजित प्रभुदेसाई यांनी केला आहे.

या तिन्ही प्रस्तावांविरोधात लढा उभारणे हे आता अगत्याचे बनले असून आता आमच्यासाठी ही परिस्थिती म्हणजे ‘करा अथवा मरा’ अशी निर्णायक झाली आहे, असे ते म्हणाले.

दक्षिण गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक काल मडगावात घेण्यात आली. यावेळी या तिन्ही मुद्द्यांवर चर्चा करून पुढील कृतीबाबत चर्चा झाली. पर्यावरण, समुद्र किनारे, उद्योग धंदे, व्यवसाय, रोजगार या संदर्भात मोठ्या प्रमाणात आक्रमण होत आहे. तर दुसरीकडे म्हादई नदीचे संरक्षण हा प्रश्‍न आहे.

Mahadayi |Coal Transportation |Goa Issue
Ponda Municipality: फोंडा पालिकेचा सोपोकर 75.36 लाख निर्धारित

हे आंदोलन अधिक व्यापक करण्याबरोबर कायदेशीर लढा कसा द्यायचा यावर मंथन झाले.  मुरगाव पोर्ट ट्रस्टचा कोळसा विस्तार संदर्भात प्रभुदेसाई म्हणाले, की सरकारने कोळसा वाहतुकीची मर्यादा झिंदाल कंपनीला 6 अब्ज टनांवरुन 13 ते 15 अब्ज टन एवढी वाढवून दिली आहे. हा निर्णय जनविरोधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mhadei Water Dispute
Goa Mhadei Water Dispute
Goa Water Resources Department Officers
500 Hectare Mining Projects
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com