national coconut conclave
national coconut conclaveDainik Gomantak

National Coconut Conclave: खोबऱ्याचे चिप्स, माडाच्या सुरापासून साखर; नारळ उत्पादने ठरली लक्षवेधी, दालनांवर कृषीप्रेमी रमले

National Coconut Conclave Exhibition: नानू फार्म्‌सद्वारे माडाच्या सुरापासून तयार करण्यात आलेली साखर अनोखी ठरत होती. एरव्ही माडाच्या सुरापासून तयार केलेले काळे गूळ सर्वांना माहीत आहे.
Published on

पणजी: नारळ याविषयाकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधावे, त्याचे घटते प्रमाण यावर विचारमंथन व्हावे, या उद्देशाने गोमन्तकने आयोजित केलेल्या राष्ट्रीय नारळ परिषदेत विविध संस्थांनी आपल्या नारळ उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात केले होते.

या दालनांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषिमंत्री रवी नाईक, नारळ उत्पादक शेतकरी, कृषितज्ज्ञ, अभ्यासक यांनी भेट देत विविध उत्पादनांची माहिती जाणून घेतली, उत्पादने खरेदी केली, विविध नारळाच्या उत्पादनांची माहिती मिळविली, प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या विविध नारळांच्या कवाथ्यांची माहिती जाणून घेत कोणते आपल्या लागवडीसाठी योग्य आहेत त्यांची खरेदीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली.

‘तनिष्का’च्या पेडणेतील सहकारी संध्या नाईक यांनी नारळाच्या करवंटीपासून तयार करण्यात आलेल्या विविध शोभेच्या वस्तू जसे की, फुलदाणी, कप, दिवा, लॅम्प आदींची कलाकुसर पाहत त्याबाबत कुतूहल व्यक्त करण्यात आले. नानू फार्म्‌सद्वारे माडाच्या सुरापासून तयार करण्यात आलेली साखर अनोखी ठरत होती. एरव्ही माडाच्या सुरापासून तयार केलेले काळे गूळ सर्वांना माहीत आहे; परंतु आरोग्यवर्धक साखर अनेकांचे लक्ष वेधत होती. काहींनी ती यावेळी खरेदीही केली.

या प्रदर्शनात गोमन्तक, तनिष्का यांच्या दालनांनादेखील नागरिकांनी भेट दिली. त्यासोबतच म्हांबरोसच्या विविध नारळाची उत्पादने, विविध तेल उत्पादने यांचीही खरेदी केली. कृषी विज्ञान केंद्र जुने गोवे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लाच्या विविध उत्पादनांची, नारळाच्या विविध कवाथ्यांची माहिती घेण्यासाठी उपस्थित गर्दी करत होते. त्यासोबतच त्यांनी या प्रदर्शनात ठेवलेले कैलासपतीचे फळ आकर्षणाचे केंद्र ठरत होते.

national coconut conclave
National Coconut Conclave: 'माड जगला तर पर्यटन टिकेल'! CM सावंतांचे प्रतिपादन; उत्‍पादन वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

म्हांबरेचे मोदक लयभारी

नारळाच्या खोबऱ्याशिवाय उकडीचे मोदक बनविणे अशक्यच... त्यामुळे नारळ आणि मोदक यांचे अतूट नाते जपत वेद म्हांबरे आणि वैष्णवी म्हांबरे यांच्या ‘द मोदकां’ना खवय्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला. पारंपरिक मोदक अतिशय चविष्टच, त्यासोबतच शुगर फ्री, आंबा, गुलकंद, अननस आणि चॉकलेट आदी फ्लेवरमध्येदेखील मोदक उपलब्ध होते. त्यांच्या या मोदकांना अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला.

national coconut conclave
National Coconut Conclave: नारळ उत्पादकांसाठी खुशखबर! 80% मागण्या मुख्यमंत्र्यांकडून मान्य; वाचा संपूर्ण अहवाल

विद्यार्थ्यांनी बनविले खोबऱ्याचे चिप्स

आजपर्यंत आपल्याला बटाटा, केळीपासून बनविलेले चिप्स खायला भेटत होते; परंतु गोवा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खोबऱ्यापासून बनविलेले चिप्स विक्रीसाठी ठेवले होते, त्यासोबतच खोबऱ्याचे लाडू व इतर उत्पादने ठेवण्यात आली होती त्याचा या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. कृषिमंत्री रवी नाईक यांनी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी दिलखुलास चर्चा करत त्यांची अनेक उत्पादनेदेखील खरेदी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com