

डिचोली: नार्वे येथील ‘देवगाळी’ या माळरानाला लागलेल्या आगीत काजूची कलमे मिळून जवळपास पाच लाखाहून अधिक रुपये किमतीची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गुरुवारी भर दुपारी ही आग लागली. दुपारची वेळ असल्यामुळे आगीने मोठा पेट घेतला. या आगीत माळरानावरील काजू कलमे बेचिराख झाली.
यात सत्यवान चोडणकर यांचे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत माळरानावरील भाजी लागवड करण्यात येत असलेल्या जमिनीतील एक झोपडीही जळून खाक झाली. आगीचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
डिचोलीच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत स्थानिकांनी आग विझवण्याचे काम हाती घेतले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य करून माघारी फिरल्यानंतर काहीवेळाने आगीने पुन्हा पेट घेतला. त्यामुळे अग्निशमन दलाला पुन्हा घटनास्थळी धाव घ्यावी लागली. दलाच्या जवानांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली.
अग्निशमनच्या निष्काळजीचा दावा
अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे आग सर्वत्र पसरली. अग्निशमन दलाचे जवान पहिल्यांदा आले होते. त्यावेळी आग व्यवस्थित विझवण्यात आली नाही, असा दावा सरपंच तुकाराम गावडे यांच्यासह सत्यवान चोडणकर आणि दामोदर माशेलकर या बागायतदारांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.