Speaker Ramesh Tawadkar: अधिवेशनाला येताना झुवारी पुलावर कार झाली लॉक, सभापती मोठ्या दुर्घटनेतून बचावले

Goa Assembly Speaker Ramesh Tawadkar: झुवारी पुलावर आल्यानंतर त्यांची कार अचानक लॉक झाली अन् पुलाच्या शेजारील संरक्षक कठड्याला धडकली.
अधिवेशनाला येताना झुवारी पुलावर कार झाली लॉक, सभापती मोठ्या दुर्घटनेतून बचावले
Speaker Ramesh Tawadkar | Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर बुधवारी अधिवेशनाला येताना मोठ्या दुर्घटनेतून बचावले. तवडकर कोणकोणमधून पर्वरीत अधिवेशनाला येत असताना त्यांची कार झुआरी पुलावर अचनाक लॉक झाली आणि पुलाच्या कठड्याला धडकली. पण, वेळेत कारच्या एअरबॅग्ज खुल्या झाल्या अन् सभापती बचावले.

गोवा विधासभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार (१५ जुलैपासून) सुरु झाले आहे. रमेश तवडकर विधानसभेचे सभापती असल्याने अधिवेशन कामकाजाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. अधिवेशनच्या तिसऱ्या दिवशी सभापती अधिवेशनासाठी वेळत पोहचण्याच्या दृष्टीने काणकोण येथील घरातून बाहेर पडले.

दरम्यान, झुवारी पुलावर आल्यानंतर त्यांची कार अचानक लॉक झाली अन् पुलाच्या शेजारील संरक्षक कठड्याला धडकली. सुदैवाने कारच्या एअरबॅग्ज वेळ उघडल्याने सभापती सुखरप राहिले. यावेळ सभापतींसोबत आणखी चालकासह सहाजण प्रवास करत होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

सभापतीने एका स्थानिक वृत्तपत्राला माहिती देताना बुधवारी मोठ्या दुर्घटनेतून बचावलो, अशी प्रतिक्रिया दिली.

अधिवेशनाला येताना झुवारी पुलावर कार झाली लॉक, सभापती मोठ्या दुर्घटनेतून बचावले
Goa Assembly Monsoon Session 2024: ‘दृष्टी’, ‘रोड शो’वरून विरोधकांचा घणाघात; खर्चावरुन प्रश्नचिन्ह

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले असून अठरा दिवस हे अधिवेशन चालणार आहे. पहिल्या दोन दिवशी सत्ताधारी भाजपने काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सभापतींची माफी मागवी अशी मागणी लावून धरल्याने मोठा गोंधळ झाला.

अखेर दोन्ही दिवशी प्रत्येकी दोनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले. अखेर घटना विसरून पुढे जाण्याची मागणी विरोधीपक्षनेते आलेमाव आणि आमदार सरदेसाई यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे असे होणार नाही याची सर्वांनी काळजी घेण्याचे मत मांडून प्रकरण संपल्याचे जाहीर केले.

काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सभापतींबाबत एसटी राजकीय आरक्षणावरुन वक्तव्य केले होते. यावरुन भाजप आमदार कृष्णा दाजी साळकर यांची डिकॉस्तांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com