Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Narkasur Chor Goa: यंदाच्या दिवाळीत काहीसा हास्यास्पद आणि मजेशीर 'चोरीचा' प्रकार गोव्यात घडला आहे, ज्यामुळे नरकासुरप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे
Diwali celebration Goa
Diwali celebration GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa funny viral video Narkasur idol: गोव्यात दिवाळी म्हटलं की पाच प्रकारचे पोहे आणि त्याहून अधिक महत्त्वाचा असतो, तो नरकासुर. नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री नरकासुराचे दहन करण्याची येथील परंपरा आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत काहीसा हास्यास्पद आणि मजेशीर 'चोरीचा' प्रकार गोव्यात घडला आहे, ज्यामुळे नरकासुरप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

दाराबाहेर सजावट करून ठेवलेला एक तयार नरकासुर चक्क चोरून नेण्यात आला आहे. या चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, दुचाकीवरून युवकांचा एक गट एका घराबाहेर उभा असलेला नरकासुर चोरून नेण्यासाठी येतो.

Diwali celebration Goa
Narkasur in Goa: नरकासुर स्पर्धेत राडा! काणकोणात मिरवणुकीच्या रस्त्यावरून दोन गट भिडले; जोरदार हाणामारी

सर्वप्रथम एक मुलगी पुढे येऊन नरकासुराला उचलण्याचा प्रयत्न करते, पण तिला तो व्यवस्थित उचलता येत नाही. त्यानंतर तिचा साथीदार येतो आणि त्याने दिव्यांच्या माळेसकट तो नरकासुर उचलून दुचाकीवर ठेवला आणि दोघेही वेगाने पळून गेले.

'नरकासुरसुद्धा सुरक्षित नाही का?' राज्यात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनांदरम्यान, आता चक्क नरकासुरसुद्धा चोरीला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये हास्यास्पद चर्चा सुरू झाली आहे. "राज्यात चोरांचा धुमाकूळ वाढलाय, पण आता नरकासूरसुद्धा सुरक्षित नाही का?" असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. हा प्रकार जरी विनोदी असला, तरी नरकासुर बनवणाऱ्या कलाकाराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. गोव्यातील दिवाळीतील हे 'नरकासुराचे अपहरण' सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com