Goa Politics: गुजरात गमावण्याच्या भीतीमुळेच हेराल्ड प्रकरणाची रणनीती, ED चा गैरवापर; चोडणकरांचा भाजपावर घणाघात

Girish Chodankar: चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे पुनरुज्जीवन हा कायदेशीर मुद्दा नाही.
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा, विशेषत: सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर केल्याची टीका काँग्रेस कार्यकारिणीचे स्थायी निमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे पुनरुज्जीवन हा कायदेशीर मुद्दा नाही. राहुल गांधी यांच्या जातीय जनगणनेच्या मागणीची भीती, गुजरात गमावण्याची भीती आणि काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन या भीतीपोटी निर्माण झालेली राजकीय रणनीती आहे.

स्वातंत्र्यलढ्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेल्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. अनेक वर्षांनंतर प्रकाशनाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या ना-नफा संस्थेची स्थापना करण्यात आली. राहुल गांधी आणि सोनिया गांधी दोघेही या उपक्रमात सहभागी झाले होते, कोणताही वैयक्तिक किंवा आर्थिक फायदा झाला नव्हता.

Girish Chodankar
Goa Politics: अभिनेते शरद पोंक्षेंना ‘सुपारीबाज’ म्हणणे खालच्या पातळीचे! मंत्री गावडेंना बडतर्फ करा; काँग्रेसची मागणी

त्यांनी पुढे म्हटले आहे की, स्वातंत्र्यलढ्यातील वारसा जपल्याबद्दल काँग्रेस नेत्यांना गुन्हेगार ठरवावे का? तसे असेल तर इतिहासाचे रक्षण करणे, लोकशाहीचे समर्थन करणे आणि मोदींच्या हुकूमशाही राजवटीला विरोध करणे हा आमचा ‘दोष’ आम्ही अभिमानाने स्वीकारतो. ते प्रकरण निराधार असूनही आणि गेल्या दशकभरात अनेकवेळा आढावा घेतला गेला असला तरी गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाने जोर पकडल्याने हे प्रकरण सोयीस्कररित्या पुन्हा समोर आले आहे.

Girish Chodankar
Goa Politics: खरी कुजबुज, मडगाव, काणकोण, सांगेला ‘अच्छे दिन’ येणार?

सुडाच्या राजकारणासमोर काँग्रेस डगमगणार नाही

काँग्रेसचा नवा जोश, तळागाळातील रणनीती आणि सरकारच्या अपयशाबद्दलच्या व्यापक असंतोषामुळे पंतप्रधान मोदी अस्वस्थ आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. भाजप सरकारची कृती कायदेशीर प्रशासनाऐवजी सुडाचे राजकारण दर्शवते. भाजपच्या या सुडाच्या राजकारणासमोर काँग्रेस डगमगणार नाही. या अन्यायाला आपण राजकीय, कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या सामोरे जाऊ. गुजरात आणि भारतातील जनता समजूतदार आहे आणि या बनावट कथेला बळी पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com