Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा मृत्यू कशामुळे झाला? गोमेकॉच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Nana Patekar Death Cause: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका (मायोकार्डियल इन्फार्क्शन) असल्याचे उत्तरीय चिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे.
Nana Patekar Death Cause
Nana Patekar DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका (मायोकार्डियल इन्फार्क्शन) असल्याचे उत्तरीय चिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) डॉक्टरांच्या पथकाने हा अहवाल पणजी पोलिसांना सादर केला आहे.

मणिपाल इस्पितळाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करणाऱ्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा होती.

Nana Patekar Death Cause
Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

अहवालानुसार, हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार झाल्याने रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन नानांचा मृत्यू झाला. पोलिसांनी नानांचे पुत्र मल्हार पाटेकर आणि भाचा प्रसाद यांचे जबाब नोंदविले होते. त्यांनी मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त केला नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com