South Goa: दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालय 'आजारी', मंजूर झालेल्या 20% जागा भरल्याच नाहीत

माहितीच्या अधिकाराअंतर्गत समोर आली माहिती
South Goa District Hospital
South Goa District HospitalDainik Gomantak

South Goa District Hospital: दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालय डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्याविना 'आजारी' असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेल्या 20 टक्के जागा अद्याप भरलेल्या नाहीत. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष घोलप यांनी याबाबत माहिती मागविली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असताना ही बाब चिंताजनक मानली जात आहे.

(133 Posts are vacant in South Goa District Hospital)

South Goa District Hospital
Chartered Plane to Goa : किर्गिस्तानचे पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल

संतोष घोलप यांनी 01 नोव्हेंबर रोजी याबाबत माहिती मागविली होती. त्यानुसार, जिल्हा रूग्णालयासाठी 642 पदं मंजूर झाली होती, त्यापैकी 509 जागा भरण्यात आल्या आहेत. मात्र, 133 जागा अद्याप रिकाम्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्यापैकी 90 जागा ह्या डॉक्टरांच्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांविना रूग्णांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

South Goa District Hospital
CM Pramod Sawant: नवीन झुआरी पुलावर खासगी गाडीतून मुख्यमंत्र्यांचा फेरफटका

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जिल्हा रूग्णालयात कार्डियाक सुविधा देखील उपलब्ध करण्याची घोषणा केली होती, त्याबाबत देखील कोणतीही हालचाल झालेली नाही. राणे यांनी नागरिकांना कार्डियाक उपाचारासाठी गोमेकॉला जाण्याची गरज नाही. जिल्हा रूग्णालयातच ही सुविधा उपलब्ध केली जाईल असे आश्वासन विश्वजीत राणे यांनी दिले होते.

दरम्यान, जगात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असताना दक्षिण गोवा रूग्णालयातील कर्मचारी संख्या ही चिंताजनक ठरू शकते. केंद्राने प्रत्येक पाच लाख लोकसंख्येसाठी कार्डियाक सेंटर सुसज्ज ठेवण्याची सूचना केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com