Shaktipeeth Expressway: 'शक्तीपीठ'मध्ये 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार, कोल्हापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी 8व्या महामार्गाची गरज काय? राजू शेट्टींचा फडणवीसांवर हल्लाबोल

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Devendra Fadnavis, Raju Shetty
Devendra Fadnavis, Raju ShettyDainik Gomantak
Published on
Updated on

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

कोल्हापूर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातून या नव्याने प्रस्तावित महामार्गाला शेतकरी मोठ्या प्रमाणावर विरोध करत असतानाही शासनाने हा निर्णय घेतल्याने शेतकरी संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

याच पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. राजू शेट्टी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत, "शक्तीपीठ मध्ये ५० हजार कोटीचा ढपला मारत आहोत हे देवेंद्र फडणवीसांनी मान्य करावे," असा आरोप केला आहे.

Devendra Fadnavis, Raju Shetty
Goa Crime: प्रेमात विश्वासघात! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, डिचोली पोलिसांकडून आरोपीला अटक

८ वा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ?

राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "सांगलीतून- कोल्हापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी बेळगांव, तिलारी, आजरा, फोंडाघाट, गगनबावडा, अणुस्करा व आंबा घाट मार्गे एवढे रस्ते सध्या अस्तित्वात आहेत.

यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग आणि ३ राज्यमार्ग असे एकूण ७ रस्ते असताना ८ वा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

देवाभाऊ तुमच्यापेक्षा गडकरी साहेब बरे. तुम्ही जनतेवर दिवसा दरोडे टाकत असल्याची टिका राजू शेट्टींनी केलीय. शेट्टींच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमधून आणि गोव्यातून जाणार आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या महामार्गासाठी एकूण १२ जिल्ह्यातील २७ हजार ५०० एकर जमीन हस्तांतरीत होणार असल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis, Raju Shetty
Goa of Bihar: बिहारमधला 'गोवा'! राज्य सरकारची जोरदार जाहिरातबाजी, ‘खरौना कॅनॉल’ होतोय Viral

मोठ्या प्रमाणात शेतजमीन संपादित होणार असल्याने अनेक शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. या महामार्गाच्या निमिर्तीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल असा सरकारचा दावा असला तरी, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे आणि राजू शेट्टींसारख्या नेत्यांच्या गंभीर आरोपामुळे हा प्रकल्प सध्या तरी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com