Nagpanchami 2023: निसर्ग संतुलित राखण्यासाठी सापांचे संवर्धन गरजेचे; सर्पमित्र प्रदीप गंवडकर यांचे प्रतिपादन

श्री हनुमान विद्यालयत प्राथमिक शाळेत नागपंचमी उत्साहात साजरा
Nagpanchami 2023
Nagpanchami 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

निसर्ग संतुलन राखण्यासाठी सर्प संरंक्षणाची आज खरी गरज आहे. तसेच सणांतून पशू, पक्षी प्राणीमात्रांशी आपल्या मनात प्रेमाची भावना वाढावी, अशी आपली भारतीय संस्कृती आहे.

ती प्रत्येकाच्या मनात रुजविणे हाच नागपंचमीचा संदेश असल्याचे प्रतिपादन सर्पमित्र प्रदीप गंवडकर यांनी वाळपई येथील श्री हनुमान विद्यालय प्राथमिक विभागात नागपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुलांना मार्गदर्शन करताना केले.

Nagpanchami 2023
Calangute Gram Sabha: 'आम्हाला गावात शाश्वत विकास हवा', ODP ला उच्च न्यायालयात आव्हान

यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना सापांविषयी बरीच व सविस्तर माहिती देण्यात आली. विविध सापांची चित्रे तसेच काही साप प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्याना दाखविण्यात आले. काही बिनविषारी साप विद्यार्थ्याना प्रत्यक्ष हाताळण्यास पण दिले.

त्याचप्रमाणे पातोळ्या बनवण्याचा उपक्रमही शाळेत राबविण्यात आला. इ. १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक तसेच पालकांच्या मार्गदर्शनाखाली पातोळ्या बनवण्याचा आनंद लुटला. विद्यार्थी, पालक शिक्षक संघ तसेच सर्व शिक्षकांनी मिळून पातोळ्या बनविल्या.

यासाठी पालक शिक्षक संघ तसेच पालकांचे विशेष सहकार्य लाभले. पालकांनी खूपच उत्साहाने उपक्रम सफल केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्वांनी पातोळ्यांचा आस्वाद घेतला. आपल्या संस्कृतीची माहिती व सणांची माहिती मुलांना लहान वयातच कळली पाहिजे.

अश्या उपक्रमांतून मुलांना आपल्या परंपरेची व संस्कृतीची माहिती मिळते. त्यामुळे श्री हनुमान विद्यालयात मुलांना सर्वांगिण शिक्षण देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु असतो.

यावेळी पालक शिक्षक संघ अध्यक्ष गंगाराम पावणे, खजिनदार गणपत नेने, उपाध्यक्ष समिक्षा गावडे, सदस्य रतिका जाधव, साईनाथ फडते , आकांक्षा गांवकर व इतर पालक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com