Beach Shack Regulations: शॅकमधील संगीताने लोकांना त्रास नको, खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन द्या; पर्यटन खात्याचे परिपत्रक जारी

Goa Beach Shack Rules: शॅक सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. तसेच, गोमंतकीय संगीत आणि गोमंतकीय खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असावा असे परिपत्रकात म्हटले आहे.
Goa Beach Shacks
Beach Music PartyDainik Gomantak
Published on
Updated on

Shack music regulations in Goa

पणजी: शॅकमध्ये वाजवले जाणारे संगीत फक्त शॅकच्या आत ऐकू येईल आणि आजूबाजूच्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खात्री करावी, असे निर्देश पर्यटन खात्याने शॅक चालकांना दिले आहेत. खात्याने शॅक चालकांना ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

शॅक सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. तसेच, गोमंतकीय संगीत आणि गोमंतकीय खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असावा असे परिपत्रकात म्हटले आहे.

गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील आव्हाने आणि अन्य सहयोगी उपायांवर चर्चा करण्यासाठी आज पर्वरीत मंत्रालयातील परिषदगृहात मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांच्या अध्यक्षतेखाली एक आंतरविभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

Goa Beach Shacks
Goa Tourism: 'गोव्यातील दारु चढत नाही', देशी पर्यटकांना गोव्याबाबत काय वाटतं? पाहा गोमन्तकचा खास रिपोर्ट Video

त्या बैठकीनंतर हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या बैठकीने पर्यटनावर परिणाम करणाऱ्या आंतरविभागीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी, समन्वित दृष्टिकोन स्वीकारण्याच्या उद्देशाने विविध खात्यातील प्रमुख भागधारकांना एकत्र आणले.

बैठकीत उपस्थितांत पंचायत आणि वाहतूक सचिव संजय गोयल, पर्यटन सचिव संजीव आहुजा, बंदर सचिव, चेष्टा यादव, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उद्योग सचिव सुनील अंचिपाका, नागरी विमान वाहतूक संचालक एस. टी. देसाई, पर्यटन संचालक केदार नाईक उपस्थित होते.

Goa Beach Shacks
Goa Tourism: ..दरवर्षी गोव्यात येणारे विदेशी पर्यटक 'श्रीलंके'कडे गेले; का होतेय संख्या कमी? व्यावसायिकांनी सांगितली कारणे

याशिवाय जीटीडीसी व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, सहसचिव (गृह) तुषार हळर्णकर, अवर सचिव (गृह), मनेश हरी केदार यांच्यासह अबकारी खाते, बंदर कप्तान खाते, पंचायत, गोवा वाहतूक आणि पर्यटन संघटना, एमपीए आणि दाबोळी व मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रतिनिधी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com