Ponda News: एन. शिवदास अनिष्ट प्रथांविरोधातील ‘फायटर’

पुंडलिक नाईक यांचे प्रतिपादन ः ‘चिंतन शिल्प'' या कविता संग्रहाचे फर्मागुढीत प्रकाशन
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak
Published on
Updated on

एन. शिवदास हे रायटर आणि फायटर असून समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात त्यांनी आवाज उठवला, त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून स्पष्टपणे जाणवते, असे उद्‍गार ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक नाईक यांनी काढले.

फर्मागुढी येथे गेल्या शुक्रवारी एन. शिवदास यांच्या ‘चिंतन शिल्प'' या कविता संग्रहाचे प्रकाशन पुंडलिक नाईक व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर पुंडलिक नाईक यांच्यासमवेत कवी शैलेंद्र मेहता, कवी एन. शिवदास तसेच रजनी नाईक उपस्थित होत्या. पुंडलिक नाईक म्हणाले की, एन. शिवदास यांनी अनेक प्रसंगी आक्रमक भूमिका स्वीकारली, त्यामुळेच ते रायटर आणि फायटर अशा दोन्ही भूमिका साकारू शकले.

Ponda News
Goa Shigmotasv 2023: दुर्भाटच्या चित्ररथाची बाजी

शैलेंद्र मेहता म्हणाले, एन. शिवदास यांच्या ‘चिंतन शिल्प’ या कविता संग्रहातून समाजातील बऱ्या वाईट प्रवृत्तीचे प्रतिबिंब उमटले आहे.

एन. शिवदास प्रास्ताविकात म्हणाले,की पुंडलिक नाईक यांच्या हस्ते या कविता संग्रहाचे प्रकाशन होत असल्याने हा क्षण आपल्यासाठी मोलाचा आहे. सूत्रसंचालन कांता गावडे यांनी केले.

Ponda News
Singing Competition: राज्ञी फळदेसाई वास्को अभंग स्पर्धेत अव्वल

कोकणीतूनही समृध्द साहित्य निर्मिती !

एखादी कविता येते ती चाल घेऊनच येते. गोव्यात संत साहित्याचा अभाव असल्याचे जरी सांगितले जात असले तरी गोव्यातूनही संत साहित्य निर्माण झाले. संत सोहिरोबानाथ आंबियेसारख्यांनी संत साहित्य निर्माण करून साहित्याला एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले.

1970 ते 1980 हा काळ कोकणीसाठी महत्त्वाचा ठरला. कोकणी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचा वाद नंतरच्या काळात झाला, पण मराठी इतकीच कोकणीतूनही समृद्ध साहित्य निर्मिती झाली.

एन. शिवदाससारख्या इतर साहित्यिकांनीही कोकणीतून सकस साहित्य निर्मिती केली, त्यामुळेच कोकणी साहित्य समृद्ध झाले,असे पुंडलिक नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com