भोपाळ ते गोवा जाणाऱ्या बसमध्ये सुरु होता अजब प्रकार; RTO अधिकाऱ्यांनी प्रवासी बनवून केला भांडाफोड

Bhopal to Goa bus news: बस स्थानिक ठिकाणीच व्यवसाय करत असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला होता. त्यामुळे स्वत: याची पडताळणी करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले होते.
RTO undercover operation Goa
Bhopal to Goa bus news
Published on
Updated on

मध्य प्रदेश: वाहतूक विभागाने दोन खासगी बसवर मोठी कारवाई केली. ऑल इंडिया परमीट असणाऱ्या या बसेसमध्ये अजब प्रकार सुरु असल्याची शंका आल्यानंतर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अधिकाऱ्यांनी स्वत: प्रवासी म्हणून प्रवास करत ट्रव्हल कंपनीचा भांडाफोड केला.

प्रादेशिक वाहतूक विभागाने याप्रकरणी अशोक ट्रॅव्हल्स आणि हमसफर ट्रॅव्हल्स या दोन बसेसना जप्त केले आहे. दोन्ही बसेसना ऑल इंडिया परमीटचा परवाना आहे. दरम्यान, बस स्थानिक ठिकाणीच व्यवसाय करत असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला होता. त्यामुळे स्वत: याची पडताळणी करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले होते.

RTO undercover operation Goa
Goa Crime: 1 जानेवारी पासून 20 खून, 15 खुनाचे प्रयत्‍न; गोव्‍याचे बिहार झाल्‍याचा विरोधकांकडून आरोप..

वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भोपाळ ते गोवा जाणाऱ्या बसमध्ये बसून प्रवास केला. दरम्यान, गोव्यासाठी निघालेली बस स्थानिक ठिकाणीच व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आरटीओ अधिकारी जीतेंद्र शर्मा यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिली आहे. गोव्याला निघालेल्या या बसमध्ये जवळच्या भागातील प्रवासी बसले होते.

RTO undercover operation Goa
Goa Taxi: 'आमच्या पोटावर पाय दिला जातोय'! काणकोणात टॅक्सी व्यावसायिक एकवटले; ‘गोवा माईल्स’विरोधात नगराध्यक्षांना निवेदन

नियम काय सांगतो?

वाहतूक विभागाच्या नियमानुसार, संपूर्ण भारताचा वाहतूक परवाना असल्यास निश्चित केलेल्या ठिकाणातच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असते. म्हणजे, भोपाळ ते गोवा जाणारी केवळ याच ठिकाणादरम्यान, वाहतूक करु शकते, त्याव्यक्तिरिक्त प्रवासी वाहतूक केल्यास नियमाचे उल्लंघन मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com