Panaji News : ‘मुष्टिफंड’मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

Panaji News : वर्ग शिक्षिका ललिता मेनन, वैशाली कवळेकर, शारदा परब यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीकरिता व यशप्राप्तीकरिता शुभेच्छा दिल्या.
Mushtifund High School Farwell 12th Student
Mushtifund High School Farwell 12th Student Dainik Gomantak

Panaji News : पणजी, रोजी मुष्टिफंड उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला.

याप्रसंगी संस्थेचे सचिव सुहास सरदेसाई, कोषाध्यक्ष दिलीप धारवाडकर, विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ परुळेकर, शिक्षिका सुचेता नाईक, कार्यक्रमाचे आयोजक श्री. पांडुरंग माशेलकर उपस्थित होते. हर्षीत अग्रवाल, असित वंजारी, दुर्वा धारगळकर, अमन दौलानी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

वर्ग शिक्षिका ललिता मेनन, वैशाली कवळेकर, शारदा परब यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीकरिता व यशप्राप्तीकरिता शुभेच्छा दिल्या.

Mushtifund High School Farwell 12th Student
Goa E-Beat Book App: आता गोवा पोलिसांवर राहणार वॉच, मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केले 'ई बीट बुक अ‍ॅप'

संस्थेचे सचिव सुहास सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांनी अत्यंत जबाबदारपूर्ण जीवन जगावे तसेच उपलब्ध असलेल्या प्रत्येक संसाधनाचा योग्य वापर करुन यशप्राप्ती करावी.

आपल्या गुरु, माता-पिता व समाजाप्रती नम्रता दर्शवावी तसेच आपल्या आवडीच्या प्रांतात प्रगती करावी, असे मार्गदर्शन केले. प्राचार्य नवनाथ परुळेकर यांनी मार्गदर्शन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com