Goa E-Beat Book App: आता गोवा पोलिसांवर राहणार वॉच, मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केले 'ई बीट बुक अ‍ॅप'

Goa E-Beat Book App: अ‍ॅपच्या माध्यमातून फिल्डवर असणाऱ्या पोलिसांवर नजर ठेवता येणार आहे.
Goa E-Beat Book App
Goa E-Beat Book AppDainik Gomantak

Goa E-Beat Book App: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी (दि.07) 'ई बीट बुक अ‍ॅप' लॉन्च करण्यात आले आहे. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे मोबाईल अ‍ॅप पोलिसांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

अ‍ॅपच्या माध्यमातून फिल्डवर असणाऱ्या पोलिसांवर नजर ठेवता येणार आहे. फिल्डवरील पोलीस कर्मचाऱ्याची माहिती थेट पोलीस खात्याच्या कार्यालयात मिळणार आहे.

यावेळी गोवा पोलीस महासंचालक जसपाल सिंग, महानिरीक्षक ओमवीर सिंग, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, प्राचार्य एम एस कृपाशंकर, प्रज्योत माईणकर इतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या अ‍ॅपची पोलिसांना मदत होणार आहे. फिल्डवर असलेल्या पोलिसांची माहिती खात्याला मिळणार आहे. फिल्डवरील पोलीस संबधित ठिकाणी गेले का? केव्हा गेले? याची माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून मिळेल.

याशिवाय पोलिसांना माहिती गोळा करणे, माहिती शोधून काढणे सोपे होणार आहे. या सर्व माहितीचा भविष्यात देखील फायदा होणार असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री सावंत यांनी केला.

अ‍ॅपच्या माध्यमातून फिल्डवरील पोलीस कर्मचाऱ्यांवर नजर ठेवणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे. लॉन्चनंतर लगेचच गोवा पोलिसांनी या प्रणालीचा वापर करणे सुरू केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com