Murrel Fish : ‘मरळ’ मासा गोड्या पाण्यातील ‘इसवण’; हैदराबादमध्ये मोठी मागणी

Murrel Fish :पणजीतील डेरिल नुनेस घेतात उत्पादन
Murrel Fish :
Murrel Fish :Dainik Gomantak

धीरज हरमलकर

Murrel Fish : पणजी, गोड्या पाण्यातला ‘इसवण’ म्हणून ज्याला संबोधले जाते त्या ‘मरळ’ या माशांना दक्षिण भारतात मरळ माशांना मोठी मागणी आणि बाजारपेठ आहे.

पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, हैदराबाद, आंध्र प्रदेश या भागातील लोक मरळ माशांची मागणी करतात, अशी माहिती पणजीतील मत्स्य उत्पादक डेरिल नुनेस यांनी दिली.

हैदराबादच्या मासळी विक्रेत्यांना ‘मरळ’ मासळीचा पुरवठा करणारे नुनीस हे एकमेव गोमंतकीय आहेत. आंध्र प्रदेश आणि हैदराबाद ही मरळ माशांची मोठी बाजारपेठ आहे, असे मत्स्य उत्पादक नुनेस यांनी सांगितले.

पणजी येथील वाहतूक व्यावसायिक डेरिल नुनेस यांनी कोविड महामारीच्या काळात वाहतूक व्यवसाय चांगला चालत नसताना मत्स्यशेती व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

मरळ मत्स्योत्पादनाबद्दल कुठेतरी वाचल्यानंतर ते कर्नाटकातील विजापूर येथे जाऊन ‘बायोफ्लॉक’ आणि मत्स्यशेतीचे तंत्रज्ञान शिकले. शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा वापर करून मरळ मासळीची लागवड करण्यात येत असलेले मत्स्यपालन फार्म त्यांनी पाहिले.

त्यांनी पुढे नमूद केले की आम्ही नंतर नऊ टाक्या बांधल्या, गरज असेल तिथे टारपोलीन टाकले, पणजीमध्ये मरळ माशांच्या लागवडीसाठी लागणारे जनरेटर आणि इतर उपकरणे बसवली. आम्ही हैदराबादमधील एका सल्लागाराची नियुक्ती केली ज्याने आम्हाला मत्स्यशेती फार्म बसवण्यात संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शन केले. हैदराबाद आणि दक्षिण भारतातील इतर ठिकाणची प्रचंड मागणी आणि बाजारपेठ लक्षात घेऊन त्यांनीच मला मरळ माशांच्या लागवडीचा सल्ला दिला, असे नुनेस म्हणाले.

Murrel Fish :
Goa Daily News Wrap: गोव्यात पर्यटकांची लूट सुरूच; नीलेश काब्राल यांच्यावर राजीनाम्याची वेळ! राज्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये मरळ माशांचा पहिला लॉट विकला गेला. मत्स्य फार्म उभारण्यासाठी ७५ लाखांची गुंतवणूक केली. मत्स्यव्यवसाय विभागानेही आम्हाला शासकीय योजनेतून मदत केली. गोव्यात जास्त मागणी असलेल्या चणक माशांचे यावर्षी डिसेंबरपर्यंत उत्पादन घेण्याचाही माझा विचार आहे.

- डेरिल नुनेस, मत्स्य उत्पादक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com