दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही; नागरी, व्‍यावसायिक विमानसेवा सुरूच राहणार - केंद्रीय विमानोड्डाण राज्‍यमंत्री मोहोळ

Dabolim Airport: विमानतळाचा दर्जा बदलून तो ‘देशांतर्गत विमानतळ’ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे केंद्रीय नागरी विमानोड्डाण राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
Murlidhar Mohol Dabolim Airport statement
Murlidhar Mohol Dabolim Airport statementDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्‍यातील दाबोळी विमानतळावरील नागरी तसेच व्यावसायिक विमानसेवा थांबवण्याबाबत किंवा या विमानतळाचा दर्जा बदलून तो ‘देशांतर्गत विमानतळ’ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे केंद्रीय नागरी विमानोड्डाण राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरात स्‍पष्‍ट केले आहे.

खासदार विरियातो फर्नांडिस यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता. दाबोळी विमानतळावरील नागरी तसेच व्यावसायिक विमानसेवा थांबवण्याबाबत कोणता प्रस्ताव विचाराधीन आहे का? असल्यास, हा निर्णय घेण्‍याचे कारण काय आहे? अशा निर्णयाबाबत गोवा सरकारशी सल्लामसलत केली का? नागरी विमानसेवेसाठी दाबोळी विमानतळाचे स्वरूप केवळ ‘देशांतर्गत विमानतळा’पुरते मर्यादित करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का? दाबोळी विमानतळ लष्करी आणि नागरी अशा दोन्ही प्रकारच्या विमान वापरासाठी कार्यरत ठेवण्याबाबत सरकारने यापूर्वी कोणताही निर्णय घेतला होता का? असे प्रश्‍‍न खासदार फर्नांडिस यांनी विचारले होते.

Murlidhar Mohol Dabolim Airport statement
Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

फर्नांडिस यांच्‍या प्रश्‍‍नांना उत्तरे देताना, दाबोळी हा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, तो भारतीय नौदलाच्या मालकीचा आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण तेथील नागरी विभागाची देखभाल करत असून, या विमानतळावर लष्करी आणि नागरी अशा दोन्ही प्रकारच्या विमानसेवांचे कामकाज चालते, असे मंत्री मोहोळ यांनी म्‍हटले आहे.

Murlidhar Mohol Dabolim Airport statement
Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

‘दाबोळी’वरून घमासान सुरूच

राज्‍यात मोपा येथे मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळ सुरू झाल्‍यापासून केंद्र सरकार दाबोळी विमानतळ बंद करण्‍याच्‍या तयारीत असल्‍याचा दावा विरोधी आमदारांकडून वारंवार करण्‍यात येत आहे. यावरून गेल्‍या काही वर्षांत झालेल्‍या विधानसभा अधिवेशनांतही सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली होती. परंतु, राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांत वाढ होत असल्‍यामुळे दोन्‍ही विमानतळांची राज्‍याला गरज आहे. त्‍यामुळे दाबोळी अजिबात बंद होणार नसल्‍याची हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com