'केरी-सत्तरी येथील गढूळ पाण्याची समस्या सुटेना'

ग्रामस्थांत संताप: एक दिवस शुद्ध, तर दुसऱ्या दिवशी दूषित पाण्याचा होतो पुरवठा
Water Proble
Water ProbleDainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये: केरी सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणारी व्यवस्था कोलमडल्याने गेल्या महिन्याभरापासून इथल्या परिसरात अधून मधून गढूळ व गढूळ आणि लोहयुक्त पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

दुसऱ्या बाजूने एक दिवस चांगले पाणी, एक दिवस गढूळ पाणी,असा पुरवठा होत असून प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना या दूषित पाण्यामागचे कारण समजत नसल्याचे पुढे आले आहे.त्यामुळे या भागातील रहिवाशांत पाणी पुरवठा खाते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र संताप असून नियमित शुद्ध व सुरक्षित पाणी देण्याची मागणी होत आहे.

Water Proble
कचरामुक्त म्हापशासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार

दूषित पाण्यामुळे आरोग्याची धास्ती

गेल्या काही महिन्याभरापासून या जलशुद्धीकरण प्रकल्पातून गढूळ आणि लोहयुक्त पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. हा पुरवठा मुख्यत्वे इथल्या रावण कॉलनी, पेळावदा, धनगरवाडा, घोटेली, केरी आदी भागात होत आहे. त्यामुळे इथले ग्रामस्थ हैराण झाले असून त्यांनी आपल्या आरोग्याची धास्ती घेतली आहे.

पाण्यात लोह जास्तच

दरम्यान धरणातून गाळयुक्त पाण्यात लोहाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. पाण्यात लोह प्रमाण जास्त असल्याने पाण्याचा रंग पिवळसर होतो. आणि अशाच पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याने लोकांच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

Water Proble
गोव्यात सर्वांच्या मदतीने सत्ता स्थापन करणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धरणातूनच येते गढूळ पाणी ?

केरीत 2 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला अंजुणे धरणातून पाणी पुरवठा होत असतो. धरणाच्या जलाशयाची पातळी उच्च असते, तेव्हा धरणाचे चांगले पाणी प्रकल्पाला मिळते. पण जेव्हा जलाशयाची पातळी खालावते तेव्हा धरणाचे खालचे दरवाजे खुले केले जातात. जेव्हा खालचे दरवाजे खुले केल्यावर जलाशयाच्या तळाच्या भागात साचलेले गाळयुक्त पाणी सोडले जाते. तेव्हा तेच पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाला येते आणि जाते प्रकल्पाची शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे धरणाचे गढूळ पाणी हेच मुख्य कारण बनले आहे. तेव्हा सरकारने धरणातून चांगले पाणी प्रकल्पाला जाईल,अशी व्यवस्था करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com