Murdi Khandepar News: खांडेपारवासीयांच्या धरणे आंदोलनानंतर 144 कलम अंशतः शिथिल

जमावबंदी मागे घ्या,बंधाऱ्याचे काम बंद करा; अन्यथा चतुर्थीत मुख्यमंत्र्यांच्या निवासापुढे ठिय्या
Murdi Khandepar Villagers Protest At Panjim
Murdi Khandepar Villagers Protest At PanjimDainik Gomantak

Government Partially Withdraws Section 144 Imposed At Khandepar: खांडेपार येथील सरकारने लागू केलेला जमावबंदीचा (कलम 144) आदेश तत्काळ मागे घ्यावा. तसेच तेथील बंधारा प्रकल्पाचे काम बंद करण्याच्या मागणीसाठी आज खांडेपारवासियांनी पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले.

अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकांवर सरकारने जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. जमावबंदी आदेश मागे न घेतल्यास ऐन गणेशचतुर्थीच्या काळात एसटी आयोगाचे कार्यालय तसेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर ठिय्या तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज खांडेपारवासीयांनी दिला.

Murdi Khandepar Villagers Protest At Panjim
Goa News: चतुर्थीच्या काळात फटाके वाजवण्यावर बंदी; उत्तर गोव्यातील संस्थेने जारी केले निर्बंध

दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच एक आदेश जारी करून मुर्डी खांडेपार येथे लागू केलेले 144 कलम शिथिल केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना हे कलम लागू होणार नाही. शिवाय लग्नसोहळा, अंत्ययात्रा आदींसाठी हे कलम वगळण्यात येणार आहे असे आदेशात नमूद करण्यात आले.

खांडेपार येथील बंधारा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असूनही तेथे येणाऱ्या काही व्यावसायिक व मेगा प्रकल्पांच्या फायद्यासाठी हा बंधारा उभारण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे स्थानिकांच्या उपजिवीकेचे साधनच नष्ट होणार आहे.

दोन वर्षापूर्वी खांडेपार येथे पूर आला होता तेव्हा तेथील अनेक घरे वाहून तसेच जमीनदोस्त झाली होती. त्यावेळी सरकारने मदतीचे आश्‍वासन देऊन काहीच केले नाही.

Murdi Khandepar Villagers Protest At Panjim
गोव्यात कुठे आणि कधीपासून खरेदी कराल iPhone 15?

सरकारकडून ग्रामस्थांची दिशाभूल

गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला असताना सरकारने खांडेपार येथे कलम १४४ लावून लोकांवर अन्याय केला आहे. या आदेशामुळे स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बंधारा प्रकल्पाला ग्रामसभेत विरोध करण्यात आला असला तरी सरकार हा प्रकल्प स्थानिकांवर लादत आहे.

लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी हा बंधारा बांधण्यात येत असल्याचे सांगून सरकार दिशाभूल करत आहे, अशी टीका कुर्टी खांडेपारच्या माजी सरपंच श्रवणी गावडे यांनी केली.

प्रकल्पामागे सरकारचा स्वार्थ

कुर्टी - खांडेपार ग्रामसभेत बंधारा प्रकल्पाविरोधात ठराव घेऊनही सरकार तेथे सुमारे ८८ कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करत आहे. यावरून सरकारचा त्यात स्वार्थ आहे हे उघड होते. सरकार अनुसूचित जमातीला आरक्षण देऊ इच्छित नाही.

सरकार आपल्या राजकीय पक्षाच्या बी टीमला पुढे काढून या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करील मात्र, लोकांनी संघटित व एकजुटीने हा लढा देण्याची गरज आहे.

सरकार सहजासहजी काही देणार नाही त्यासाठी संघर्ष करावा लागेल व त्याची तयारी ठेवा,असे आवाहन आमदार विजय सरदेसाई यांनी या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com